Home १० वी बालभारती वाट पाहताना vaat paahtaanaa std 10th

[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] वाट पाहताना vaat paahtaanaa std 10th

17
0

[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] वाट पाहताना vaat paahtaanaa std 10th

अरुणा ढेरे (१९५७)
मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक त्यांनी साहित्य क्षेत्रातील कविता, कथा, संशोधन, समीक्षा इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये आपल्या लेखनाने मोलाची भर घातली आहे.
कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादात्मक समीक्षा, संशोधनपर लेखन इत्यादी विविध प्रकारचे लेखन तितक्याच ताकदीने करणाऱ्या अरुणा ढेरे यांच्या लेखनातून त्यांचे वेगळेपण सिद्ध होते.
त्यांची प्रत्येक साहित्यकृती काव्यरूपात मनाला थेट भिडणारी असते. काव्यात्मक व मानवी नात्याचा शोध घेणारे ललितसाहित्य हा त्यांचा विशेष आहे.
पहा: Saibaba Images
लेखिकेचे साहित्यलेखन
कवितासंग्रहः ‘मंत्राक्षर’, ‘निरंजन’, ‘जावे जन्माकडे’,“यक्षरात्र’, ‘सृजना’
कथासंग्रहः कृष्णकिनारा’, ‘अज्ञात झऱ्यावर रात्री….‘प्रतिष्ठेचा प्रश्न’ (अनुवादित), ‘पावसानंतरचे ऊन’
स्फुटलेखसंग्रहः ‘रूपोत्सव’
कादंबरी: ‘मैत्रेयी’, ‘नव्या जुन्याच्या काठावरती’, ‘उर्वशी’
संशोधनात्मक / समीक्षात्मक लेखन: ‘नागमंडल’,‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘विस्मृतिचित्रे’
ललित: ‘प्रकाशाचे गाणे’, ‘प्रेमातून प्रेमाकडे’, ‘काळोख आणि पाणी’, ‘आठवणीतील अंगण’
ऐतिहासिक लेखन: ‘राजतरंगिणी’
बालसाहित्य: ‘सुंदर जग हे’, ‘मामाचं घर’, ‘एका राजाची कथा’
पाठाचा आशय
माणसातील आशावाद हा त्याला जगण्याचे कारण मिळवून देत असतो. कोणत्याही गोष्टीची वाट पाहणे हा या आशावादाचाच एक भाग होय. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ‘वाट पाहणे’ ही बाब अटळ अशी असते. हे वाट पाहणे कधी सुखद तर कधी दुःखद, कधी उत्कंठा वाढवणारे तर कधी हुरहुर लावणारे, दडपण आणणारेही असते. या वाट पाहण्यातील विविधता, त्यामागील कारणे व त्यामागे असलेली आर्तता याचे वर्णन विविध उदाहरणांद्वारे लेखिकेने केले आहे.

 : पाठ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा :

https://youtu.be/8PQ8RjTvbcw

वाट पाहताना मार्गदर्शिका सौ. सुषमा मानेकर,अमरावती

वाट पाहताना -१[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] वाट पाहताना vaat paahtaanaa std 10th

वाट पाहताना -२


प्रश्न 2.
कारणे शोधा
(अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ……………………………………
उत्तर:
होळीनंतरच्या काळात किंचित गारवा असलेल्या रात्री लेखिकेला गाढ झोप लागे; पण त्याआधी कोकिळेच्या कुंजनाचे सूर आपल्या कानी पहाटे पडतील का? असा प्रश्न तिला पडे. या आवाजाची ती आतुरतेने वाट पाही. जेव्हा पहाटे उठून त्या कोकिळेची कुहू कुहू लेखिकेच्या कानी पडे तेव्हा तिच्या वाट पाहण्याचं सार्थक होई.

(आ) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ……………………………………
उत्तर:
दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो, आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे, या कल्पनेने तिचे मन सुखायचे.

(इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ……………………………………
उत्तर:
मुळातच पुस्तक वाचनाची आवड असणारी लेखिका टीची वाट पाहत असायची कारण या काळात तिला माळ्यावर बसून विविध प्रकाराची पुस्तके निवांतपणे वाचता येत. या पुस्तकांच्या आगळ्या वेगळ्या जगाची आणि लेखिकेची गाठभेट सुट्टीत होत असे. या पुस्तकातून कधी न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग या साऱ्या अनोळखी; पण तरीही आपल्याशा वाटणाऱ्या, थक्क करून सोडणाऱ्या गोष्टी समोर येतात. या शब्दांमध्ये असलेली, लेखिकेला भारून टाकणारी जादू, त्यातील नवेपणा, त्यातील भाषेत असलेली ताकद, त्यामागील लेखकाची प्रतिभा, त्याच्या कल्पनेचे कागदावर झालेले चित्रण या साऱ्याची कल्पना करूनच लेखिकेला गंमत वाटे. या उन्हाळ्याच्या आधी सुट्टी जवळ आल्याची व त्यामुळे आपल्या आवडीला सवड मिळण्याची वेळ जवळ येत असल्याची जाणीव होत असल्याने हा काळ लेखिकेला वेड लावायचा.

(ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ……………………………………
उत्तर:
वस्तीवर राहणारी अंध म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत असते. त्याचे पत्र येईल, तो स्वतः तिला भेटायला येईल या वेड्या आशेने ती जगत असते. तिचा मुलगा तिला कधीच पत्र लिहित नाही, तिची साधी चौकशीही करत नाही; पण तिच वेडी आशा, वाट पाहण्यामागील तिची तळमळ पोस्टमनला सहन होत नाही. त्या म्हातारीला काही काळापुरते का असेना; पण बरे वाटावे, आनंद मिळावा, म्हातारीचे शेवटचे दिवस समाधानात जावे या हेतूने पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो.


उपयोजित लेखन
कथालेखन
बातमी लेखन 
संवाद लेखन 
पत्रलेखन
जाहिरात लेखन 
सारांश लेखन

प्रश्न 3.
तुलना करा.

व्यक्तीशी मैत्री कवितेशी मैत्री
…………………….. ……………………..
…………………….. ……………………..
…………………….. ……………………..

उत्तर:

व्यक्तीशी मैत्री  कवितेशी मैत्री
आपण त्या व्यक्तीला हाक मारतो. तिच्याकडे धावतो. मनसोक्त गप्पा मारतो. ती व्यक्ती प्रतिसादही देते. व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते.  कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसे. मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटे. कविता मात्र खूप वाट पाहायला लावते.

प्रश्न 4.
‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा.

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे
…………………….. …………………….. ……………………..
…………………….. …………………….. ……………………..
…………………….. …………………….. ……………………..

उत्तर :

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे
दुःख, काळजी, अस्वस्थता  धीर धरणे  सुखाची चव वाढते,
अस्वस्थता  संयम बाळगणे  यशाची गोडी वाढते,
तडफड  एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे. प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढते, आयुष्याबद्दल ओढ वाढते.

मराठी
कुमारभारती
इयत्ता : दहावी

 

बोलतो मराठी...  – डॉ.नीलिमा गुंडी 
आजी : कुटुंबाचं आगळ  -प्रा.महेंद्र कदम 
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास 
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता )  - द.भा.धामणस्कर 
गवताचे पाते   - वि.स.खांडेकर
वाट पाहताना   - अरुणा ढेरे 

 


स्वमत :
कृती : पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः माणूस म्हटला की त्याला जोडून ‘आशावाद’ हा येतोच. हा आशावादच त्याच्या जीवनाविषयी त्याची ओढ टिकवून ठेवत असतो. हा आशावाद म्हणजेच एखादया गोष्टीची वाट पाहणे. प्रस्तुत पाठात लेखिका अरुणा ढेरे यांनी अशाच ‘वाट पाहण्याच्या संदर्भातील विविध अनुभवांचे वर्णन केले आहे. या अनुभवांतून जीवनातील विविध टण्यांवरील निर्माण होणारा आशावाद लेखिकेने मांडला आहे.
माणसाला जीवन जगत असताना प्रत्येक टप्यावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहावीच लागते. या वाट पाहण्यामागे असलेली आर्तता, त्यासाठी होणारी तगमग, होणारा त्रास, मिळणारे दुःख या सर्व गोष्टी त्या ‘वाट पाहण्याला’ अधिक दृढ करतात. जेव्हा ती गोष्ट आपल्यासमोर उभी राहते, आपले वाट पाहणे जेव्हा संपते तेव्हा मिळणारा आनंद हा विशेष मोलाचा असतो हे निश्चित. हे ‘वाट पाहणे’ पुन्हा सुरू होते. वाट पाहायला लावणारी गोष्ट मात्र वेगळी असते.
प्रस्तुत पाठात लेखिकेने या ‘वाट पाहण्या’ मागील सुखद, दुःखद, मन हेलावणारे पैलू समोर आणले आहेत. असे अनेकविध पैलू प्रत्येकाच्या जीवनात असणे अटळ असते. त्यामुळेच या पाठाला दिलेले ‘वाट पाहताना’ हे नाव अतिशय योग्य आहे.
कृती : म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर: वाड्या-वस्त्यांवर पत्र वाटत आयुष्य खर्च केलेल्या पोस्टमनचे त्या वाड्या-वस्त्यांवरील लोकांशी एक प्रकारचे बंध जुळले होते. केवळ नोकरीपुरते त्यांचे नाते मर्यादित राहिले नव्हते. पत्रांद्वारे माणसांपर्यंत सुख पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पोस्टमन अनेक वर्षापासून करत होता. त्याने एका अंध म्हातारीच्या जीवनाचा आधार सांभाळून ठेवला होता. म्हातारीचा दूर राहणारा मुलगा आपल्या आईशी संपर्कही करत नसे; मात्र तो येईल, त्याची पत्रं मिळतील या एका वेड्या आशेवर ती म्हातारी जिवंत होती. तिच्यातील ही उमेद कायम टिकावी या हेतूने पोस्टमन म्हातारीच्या मुलांनी कधीही न पाठवलेली पत्र वाचून म्हातारीच्या जीवनाला बळकटी देत होता.
एखादे सत्य जर समोरच्या व्यक्तीला मुळापासून उखडून टाकणारे असेल, तिच्या जगण्याचा आधार हिसकावून घेणारे असेल, तर ते त्या व्यक्तीपर्यंत न पोहोचणेच योग्य असा विचार त्या पोस्टमनने केला असावा. पोस्टमनच्या त्या कृतीमुळे म्हातारीचे आयुष्य मायेच्या ओलाव्याने भरून जात होते, सुखकर होत होते. त्यामुळे, पोस्टमनने केलेली ही युक्ती अतिशय योग्य वाटते.
कृती : ‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक • गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तर: लेखिका ‘वाट पाहणे’ ही संकल्पना व तिच्यामागे दडलेले सुखद अनुभव सांगते; मात्र प्रत्येक वेळी वाट पाहणे सुखद असतेच असे नाही.
वाट पाहण्यात प्रचंड आर्तता असते, त्यामागे भेटीची तळमळ असते, दुःख असते, कळकळ असते; मात्र या सगळ्यांमुळे कोणत्याही गोष्टीसंदर्भात संयम राखण्याचा गुण मानवात रुजला जातो. वाट पाहण्यातून त्या गोष्टीवरचा विश्वास व ध्यास वाढत जातो. या उत्कटतेमुळे, त्यातून निर्माण होणाऱ्या आर्ततेमुळे मिळणाऱ्या सुखाची चव अधिक सुखावह असते. मिळणाऱ्या यशाची किंमतही जास्त असते. त्यातून मिळणारे समाधानही तृप्त करणारे ठरते. जीवनात सहजपणे प्राप्त होणाऱ्या गोष्टींना किंमत नसते; मात्र दुःखानंतर येणाऱ्या सुखाची गोडी काही निराळीच असते. हा गोडवा प्रत्येकाला आधीच्या कडूपणामुळेच अनुभवता येतो. त्यामुळे, जीवनाचे मोल लक्षात येण्यास मदत होते.
कृती :‘सुट्टीची वाट पाहणं’ याबाबतीतील तुमचे अनुभव लिहा.

उत्तर: ‘सुट्टीची वाट पाहणं’ हे तर सर्वांनाच आवडतं. शाळेच्या नित्याच्या दिनक्रमातून मिळणारा विरंगुळा म्हणजे सुट्टी; पण मी स्वतःच्या सुट्टीपेक्षाही जास्त उत्सुकतेने वाट पाहतो ती माझ्या बाबांच्या सुट्टीची. माझे बाबा सैन्यात अधिकारी आहेत. त्यामुळे, वर्षातील बहुतेक काळ ते घरापासून, आमच्यापासून दूर असतात. ते सुट्टी घेऊन घरी येणार हे कळल्यावर घरातील वातावरणच पालटते. आई त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करण्याच्या नियोजनात गुंतते. मी आणि माझी बहीण मीरा बाबा आल्यावर कुठे कुठे फिरायला जायचं, या विचारात मग्न होतो. वर्षभरातील अनेक गोष्टी बाबांना सांगायच्या असतात. फोनवर शक्य न होणाऱ्या गप्पांचे फड रंगवायचे असतात. मनातल्या मनात मी त्यांच्याबरोबर करायच्या सगळ्या गमतीजमतींची यादी करत राहतो. बाबांच्या सुट्टीइतकेच त्यांच्या सुट्टीची वाट पाहण्याचे हे दिवस माझ्या मनाला उत्साह आणि आल्हाद देऊन जातात.

कृती : लेखिकेस लहानपणापासूच साहित्यक्षेत्राची आवड होती, हे परिच्छेदाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तरः लहान मुलांकरता सुट्टी म्हणजे मजा, मस्ती, खेळ, धमाल हे अपेक्षित असते; मात्र लेखिका या साऱ्या गोष्टीऐवजी पुस्तकवाचनासाठी सुट्टीची वाट पाहते. यातून तिचे वेगळेपण दिसून येते. सुट्टीच्या काळात मिळणाऱ्या निवांत वेळी पुस्तकांच्या गराड्यात बसून हव्या त्या पुस्तकाचा आस्वाद घेणे लेखिकेला अधिक पसंत होते. अगदी लहानपणापासून प्रचंड साहित्य वाचता यावे, त्याचे सारे पैलू माहीत व्हावेत, या एका हेतूसाठी लेखिका या सुट्टीची वाट पाहत असे.
कधीही न भेटलेले, न अनुभवलेले, न पाहिलेले प्रसंग, व्यक्ती या अनोळखी असल्या तरीही पुस्तकांतून ओळखीच्या वाटू लागतात. या साऱ्या साहित्यामागे ते सुचण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, भाषा यांची ताकद तिला आकर्षित करे. या कारणांमुळे ती सातत्याने पुस्तक वाचनासाठी सुट्टीची वाट पाहत असे.लेखिकेच्या साहित्याप्रती असलेल्या आकर्षणातून तिची साहित्यक्षेत्राची आवड दिसून येते.

कृती : ‘वाट पाहताना’ या पाठाचा सारांश थोडक्यात लिहा.
उत्तर: सदर पाठात लेखिका अरुणा ढेरे यांनी ‘वाट पाहणे’ या गोष्टीचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना लहान-लहान गोष्टींमागील उत्सुकता, त्यांच्या आगमनाची आतुरता लेखिका विविध प्रसंगांतून व्यक्त करतात. ‘वाट पाहणे’ ही प्रत्येकाच्या जीवनात अटळ असणारी बाब विविध प्रसंगानुभवातून त्या चित्रित करतात. या वाट पाहण्याला असणारा हळुवार दुःखाचा, आतुरतेचा, काळजीचा पैलूही त्या अलगदपणे समोर आणतात. ‘वाट पाहणे’ ही केवळ सुखदायक बाब नसून काही वेळा ती दुःख देणारी, बोचरीही असू शकते, याचे वर्णन एका चित्रपट कथेच्या साहाय्याने लेखिकेने केले आहे. वाट पाहण्यातील कडू-गोड अनुभवांसोबतच वाट पाहण्याचे महत्त्वही हा पाठ आपल्यासमोर मांडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here