. |
– कृती –
(१) आकृत्या पूर्ण करा.
(अ) संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
➤ अपकीर्ती टाळावी.
➤ सत्कीर्ती वाढवावी.
➤ सत्याची वाट धरावी.
(आ) कधीही करू नयेत अशा गोष्टी
➤ पुण्यमार्ग सोडू नये.
➤ पैज किंवा होड लावू नये.
➤ कुणावरही आपले ओझे लादू नये.
➤ असत्याचा अभिमान बाळगू नये.
Uttam lakshan swadhyay iyatta dahavi
(इ) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
( खालील उत्तर फक्त मार्गदर्शक आहे.स्वमत लिहा.)
गुण
१) इतरांविषयी वाईट न बोलणे.
२) गरजूंना मदत करणे
३) जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास.
दोष
१) बहिण-भावंडां सोबत मत्सर
२) कुणावरही लवकर विश्वास ठेवणे.
३) कधीकधी आळस येतो.
(२) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
( अ) तोंडाळ ⇒ तोंडाळांशी भांडू नये.
(आ) संत ⇒ संतसंग खंडू नये.
(३ ) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी दक्षता
(१) आळस ➤ आळसात सुख मानू नये.
(२) परपीडा ➤ परपीडा करू नये.
(३) सत्यमार्ग ➤ सत्यमार्ग सोडू नये.
. |
(४) काव्यसौंंदर्य.
(अ) खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा.
‘जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।‘
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तीमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी वरील ओवीमध्ये तीन लक्षणांची चर्चा केली आहे.
काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती अमान्य करू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून चांगल्या मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा. कधीही पुण्पुयमार्गाने जाण्याचे सोडू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.
(आ) ‘सभेमध्ये लाजों नये । बाष्फळपणे बोलों नये ।’,या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर:
‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण वरील चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये. बाष्कळपणे बोलू नये.
उत्तम पुरूषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.
(इ) आळसे सुखसु मानूं नये’, या ओळीचा तुम्तुहांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर:
‘उत्तमलक्षण’ या ओव्यांंमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे.
‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो !’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटखुंते, भविष्य अंधारते. ते आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सूख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.
. |
कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कृती सोडवा.
कविता – उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेचे कवी /कवयित्री : संत रामदास.
- कवितेचा रचनाप्रकार : ओवी.
- कवितेचा काव्यसंग्रह : श्रीदासबोध.
- कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.
- कवितेतून व्यक्त होणारा ( स्थायी )भाव : आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास
- कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात आल्यावर मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने ही कविता आपली स्वतःची स्वतः साठी असलेली वाटते.
- कवितेतून मिळणारा संदेश : प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला समाज समर्थ समाज निर्माण होतो. हाच संदेश या कवितेतून मिळतो.
मराठी
कुमारभारती
इयत्ता : दहावीबोलतो मराठी... – डॉ.नीलिमा गुंडी
आजी : कुटुंबाचं आगळ -प्रा.महेंद्र कदम
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता ) - द.भा.धामणस्कर
गवताचे पाते - वि.स.खांडेकर
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– –