Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board उपयोजित लेखन| मराठी कुमारभारती | आत्मकथन | Upyojit lekhan | Marathi...

उपयोजित लेखन| मराठी कुमारभारती | आत्मकथन | Upyojit lekhan | Marathi Kumarabharati | aatmkathan

28
0

उपयोजित लेखन| मराठी कुमारभारती | आत्मकथन | Upyojit lekhan | Marathi Kumarabharati | aatmkathan

उपयोजित लेखन मराठी कुमारभारती आत्मकथन , Upyojit lekhan Marathi Kumarabharati  aatmkathn, उपयोजित लेखन मराठी, कुमारभारती  आत्मकथन , Upyojit lekhan, Marathi Kumarabharati , aatmkathn, आत्मकथन इन मराठी, आत्मकथन मराठी, aatmkathn in marathi, आत्मकथन निबंध ,आत्मकथन कसें करावे

स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता/कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी, आज आपण आत्मकथन या निबंध लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत.

💥आत्मकथन
  आत्मचरित्र म्हणजे केवळ आत्मकथनात्मक निबंध नव्हे. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे ‘आत्मकथन’ करावयाचे त्याच्या अंतरंगात आपण मनाने शिरून त्याची सुख-दु:खे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करावयाचे. या कथनात कल्पनाविलासाला भरपूर वाव असतो. दिलेल्या विषयाच्या वैयक्तिक जीवनात घडलेल्या सर्वच प्रसंगांचे कथन करण्याऐवजी काही निवडक प्रसंग लिहिणे परिणामकारक ठरते.
   आत्मकथनात्मक निबंधातील वाक्यरचना प्रथमपुरुषी असावयास हवी. या प्रकारच्या निबंधांना कोणी ‘मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मवृत्त’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ – फळ्याचे आत्मवृत्त, रायगड बोलू लागला तर, राष्ट्रध्वज सांगतोय आपुली कहाणी, शाळेतील घंटेचे मनोगत वगैरे……

💥आत्मकथनात्मक निबंधातील आणखी काही
आपला आत्मकथनात्मक निबंध चांगला व्हावा असे वाटत असेल तर निबंधात येणारा तोचतोचपणा टाळला पाहिजे.त्यापेक्षा वेगळेपणा आपल्या आत्मकथनात्मक निबंधात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘मी बोलत आहे अशी सुरुवात करावी.
पहिल्या परिच्छेदात कोण आत्मकथन करीत आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

💥आत्मकथनेही वस्तूंची, वास्तूंची, प्राण्यांची, पक्ष्यांची, माणसांची असतात. त्यातून त्यांची सुखदुःखे, जीवनाविषयक दृष्टिकोन स्पष्ट व्हावेत. माणसामाणसांतील संबंध, माणसे व वस्तू किंवा वास्तू यांच्यातील संबंध स्पष्ट व्हावेत. मानवेतर सृष्टीतील वस्तू, वास्तू किंवा झाडे माणसांचे जीवन पाहात असतात. माणसांचे चुकते कोठे, हे त्यांना सांगावेसे वाटते. ते सारे अनेकदा माणसांच्या जगातील चांगल्यावाईट गोष्टींचे साक्षीदार असतात. त्यांना माणसांबद्दल, मुलांबद्दल काय वाटते ते आपण आत्मकथनात्मक निबंधातून सांगू शकतो. त्यामुळे आपल्या निबंधात वेगळेप
णा येऊ शकतो.
 💥आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे  💥
🔴 आपण स्वतः ती वस्तू घटक आहोत अशी कल्पना करावी. आत्मकथनात सजीव व निर्जीव वस्तू स्वतः बोलत आहे, अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असावे.
🔴 मानवाप्रमाणे निर्जीव वस्तूंनाही सुखदुःखे यासारख्या भावना असतात अशी कल्पना करून
लेखन करावे.

🔴 ज्या घटकाचे आपण आत्मकथन करणार आहोत त्या घटकाच्या जागी आपण आहोत असे मानून कल्पनेने त्याच्या सुख दुःखाचा अनुभव घेवून त्याचे लेखन करावे.
🔴 ज्या घटकाचे आत्मकथन आपण करणार आहोत त्या घटकाचा जन्म, परिस्थिती, जगताना वाटणारी सुखदुःखे व त्या घटकाची असणारी आजची अपेक्षा या गोष्टींचा उल्लेख करावा. 
🔴 एखादे चित्र किंवा एकापेक्षा अधिक घटक एकत्र दिले जातील त्यातील कोणतातरी एक घटक अन्य घटकांशी किंवा त्यापैकी एकाशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल.
🔴 दिलेला घटक विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वातलाच असतो.
💥 उदा. ‘फळ्याचे आत्मकथन’…… काही भाग  
    ‘फळ्याचे आत्मकथन’ मध्ये फळा एका विद्यार्थ्याच्या जीवनातील प्रसंग कशा रीतीने सांगतो, ते पहा….. फळा बोलत आहे, हे लक्षात घेऊन पुढील परिच्छेद वाचा.
 ‘आठवतं तुला? तेव्हा तू होतास पाचवीत. तास होता आठवा चित्रकलेचा! माझं लक्ष होत तुझ्याकडे, अगदी कंटाळून गेला होतास तू. त्यात तास चित्रकलेचा! तुझा नावडता! तुझ्या कपाळावर किती आठ्या दिसत होत्या. तेवढ्यात चित्रकलेचे सर वर्गात आले अगदी हसतमुख ! त्यांनी एकदा माझ्याकडे म्हणजे फळ्याकडे पाहिलं. हातातील खड्डूनं मोजक्या रंगरेषांतून एक ‘मोर’ त्यांनी साकार केला. माझ लक्ष होतं तुझ्याकडे. चित्रातील मोराकडे अगदी टक लावून तू पाहात होतास आणि….. अगदी नकळत तू आपल्या दप्तरातून चित्रकलेची वही काढलीस. पेन्सिल हाती घेतलीस एकदा तू माझ्याकडे पाहात होतास एकदा वहीकडे, तुझ्या वहीतल्या मोराचं चित्र पूर्ण झालं. डोळ्यांसमोर थोडं अंतर ठेवून तू वहीतील ‘तुझ्या ‘ मोरांकडे पाहिलंस, खुदकन हसलास. मनातल्या मनात म्हणालास, “वा! काय छान जमलाय मोर! वाटतं टुणकन उडी मारून नाचायला लागेल वर्गभर!” तुझ्या मनातलं कुणी ऐकलं? मी ! फळ्यानं! मला खूप खूप आनंद झाला. कारण माहीत आहे? तुझा नावडता विषय आज आवडता झाला होता. आठव्या तासाचा कंटाळा निघून गेला होता. शिवाय तुझ्या रूपानं मी एक कलावंत पाहिला होता !”
👆👆आता वरील उताऱ्यात फळा बोलतो आहे, असा अनुभव आला की नाही? ज्याला बोलता येत नाही, त्याला बोलता येतं; ज्याला भावना नाहीत असं वाटतं, त्याला भावना आहेत; ज्याला माणसासारखं जीवन नाही त्याला माणसासारखं जीवन आहे अशी कल्पना करून मानवेतरांचे आत्मकथन लिहितात.या प्रमाणे आत्मकथन लिहण्याचा सराव करुया….
💥 अधिकचा सरावासाठी कृती येथे पहा.💥

 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here