Home Uncategorized इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2023

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2023

31
0

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 प्रश्नपत्रिका 2023 -गुण : 40

प्रश्न. ला. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. गुण : 5

1) अल्कधर्मी मृदा धातूंच्या अणूच्या बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन असतात.

(अ) 1 (ब) 2 (क) 3 (ड) 7

उत्तर – 1

2) पितळी भांड्यावर क्षरणामुळे हिरवट थर जमा होऊ नये म्हणून पुढीलपैकी कोणती क्रिया कराल?

(अ) कथिलीकरण (ब) धनाग्रीकरण (क) विलेपन (ड) संमिश्रीकरण

उत्तर – कथिलीकरण

3) पुढे दिलेल्या कार्बनी संयुगाच्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा :

(अ) समावेशन (ब) प्रतियोजन (क) अपघटन (ड) क्षपण

उत्तर – अपघटन

(4) अनंत अंतरावर असणाऱ्या वस्तूची बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा—– असते.

(अ) सुलटी व वास्तव (ब) सुलटी व आभासी (क) उलट व वास्तव (ड) उलट व आभासी

उत्तर – उलट व वास्तव

5) ——-हे पाण्याच्या असंगत आचरणाचे उदाहरण आहे.

(अ) दवबिंदू निर्मिती (ब) गोठणे (क) हिवाळ्यात खडकांना भेगा पडणे (ड) बाष्पीभवन

उत्तर – हिवाळ्यात खडकांना भेगा पडणे

प्रश्न. ला. (ब) पुढील प्रश्न सोडवा.  गुण : 5

1) चूक की बरोबर ते लिहा :

१) पृथ्वीच्या आत आत जात असताना खोलीनुसार 8 (गुरुत्व त्वरण) चे मूल्य वाढत जाते.

उत्तर – हे विधान चूक आहे.

2) पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात ?

उत्तर – ओझोन /H2O2/KMnO4/H2SO4 (कोणताही एक ऑक्सिडक)

3) गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे समर्थन करा :

व्होल्टमीटर, थर्मामीटर, अ‍ॅमीटर, गॅल्व्हानोमीटर

उत्तर – थर्मामीटर

4) पुढील आकृतीत दाखवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहा.

उत्तर – दूरदृष्टिता

5) C4H10 हे रेणुसूत्र दर्शवणाऱ्या हायड्रोकार्बनचे नाव ओळखून त्याचे रचनासूत्र काढा.

उत्तर – हायड्रोकार्बनचे नाव : ब्युटेन.

रचनासूत्र : CH3 -CH2 – CH2 – CH3

प्रश्न रा. (अ) शास्त्रीय कारणे लिहा : (कोणतीही दोन) गुण : 5

1) कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी आहे.

उत्तर – 1) कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता असल्याने, त्यातून मोठे रेणू तयार होतात. यामुळे कार्बनी संयुगांची संख्या वाढते. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंध शक्ती (Catenation Power) म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृखला किंवा बद्ध शृखला म्हणजेच वलयाकार रचना होय. मुक्त शृखला ही सरल शृखला किंवा शाखीय श्रृंखला असू शकते. दोन कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे तो स्थायी असतो. या स्थायी प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखलाबंधन शक्ती प्राप्त होते.

2) दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी सहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध व तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगांची संख्या वाढते आहे. उदा., कार्बनच्या दोन अणूंपासून ईथेन (CH3 CH3), एथीन (CH2 = CH2) व ईथाइन (CH=CH) अशी तीन संयुगे तयार होतात. ज्ञात कार्बन संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे.

3) कार्बन हा चतु:संयुजी असतो. जेव्हा एक कार्बन अणू चार कार्बन किंवा इतर अणूंशी बंध तयार करू शकतो; तेव्हा अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत; त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदा., हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयुजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने पाच वेगवेगळी संयुगे तयार होतात. CH4, CH3CI, CH2CI2, CHCI3, CCI4. अशाच प्रकारे अणूंचे 0, N, S, halogen, P इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. यामुळे संयुगांची संख्या वाढते.

4) कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे. ते म्हणजे ‘समघटकता’ होय. 

2) उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदा., इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोमसारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करीत नाहीत.

उत्तर – 1) विदयुत इस्त्री, टोस्टर यांसारख्या साधनांचे कार्य विदयुतधारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विदयुत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते.

2) नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते. म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोमसारख्या संमिश्राचा उपयोग करतात.

3) एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.

उत्तर – 1) मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाहयतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते.

2) गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा – इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात.

उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.

प्रश्न रा. (ब) पुढील उपप्रश्न सोडवा : (कोणतेही तीन) गुण : 10

1) पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती?(प्रकाशाचा निर्वातातील वेग 3 x 108 m/s)

उत्तर –

2) पुढील दिलेल्या हायड्रोकार्बनची IUPAC नावे लिहा :

अ) CH3 -CHOH-CH3
आ) CH3 -CH2-COOH

उत्तर –

3) जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल, तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती ?
उत्तर –

4) पुढील दिलेल्या आकृतीतील प्रक्रिया ओळखून थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर – आकृतीतील प्रक्रिया धनाग्रीकरणाची आहे. या पद्धतीत तांबे अ‍ॅल्युमिनिअमसारख्या धातूंवर विदयुत अपघटनावारे अ‍ॅल्युमिनिअम किंवा तांब्याच्या ऑक्साइडचा पातळ, मजबूत लेप देतात. जेव्हा ॲल्युमिनिअमचे धनाग्रीकरण करतात तेव्हा तयार झालेल्या अ‍ॅल्युमिनिअमच्या पातळ ऑक्साइड थरामुळे अ‍ॅल्युमिनिअमचा ऑक्सिजन व पाणी यांच्याशी संपर्क रोखता येतो. त्यामुळे नंतरचे ऑक्सिडीकरण रोखले जाते.

हा लेप धातूचे क्षरण होण्यापासून संरक्षण करतो. धनाग्रीकरण करताना ऑक्साइडचा थर अधिक जाड करून हे संरक्षण वाढवता येते. या पद्धतीत तांबे किंवा ल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. स्वयंपाकगृहात वापरले जाणारे अॅनोडाइज्ड प्रेशर कुकर, कढई तसेच सरकत्या खिडक्यांच्या फ्रेम्स हे सर्व धनाग्रीकरण तंत्राचे उपयोजन आहे.

5) ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत ?

उत्तर – 1) भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दैनिक परिवलन गती आणि उपग्रहाची भ्रमणगती यांची दिशा एकच असल्याने त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थितीही स्थिर राहते.
2) हे उपग्रह कधीही ध्रुवीय प्रदेशावरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्थिर उपग्रह ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाहीत.

ssc maharashtra board science 1 question paper 2023 with answers

प्रश्न. 3 रा. पुढील उपप्रश्न सोडवा : (कोणतेही पाच) गुण : 10

1) स्वराली प्रयोग करीत असताना तिला आढळलेले निरीक्षण खाली दिले आहे. त्या निरीक्षणावरून तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दया :
स्वरालीस प्रयोग करीत असताना प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून दूर जात असल्याचे दिसून आले. स्वरालीने आपाती कोनाचे (i) मूल्य वाढवत नेल्यास अपवर्तित कोनाचे (τ) मूल्य वाढले, परंतु विशिष्ट आपाती कोनानंतर मात्र प्रकाशकिरणे घन माध्यमात परत येताना दिसली. यामुळे स्वरालीस काही प्रश्न पडले त्यांची उत्तरे लिहा.

अ) i च्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात ? त्यावेळी चे मूल्य किती असते?
आ) प्रकाशकिरण घन माध्यमात परत येण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात ? ती प्रक्रिया समजावून सांगा.

2) पुढील आकृती कोणते नियम दर्शवते ते ओळखून संबंधित तीन नियम लिहा.

3) ‘अ’ या धातूचा अणुअंक 11 आहे आणि ‘ब’ या धातूचा अणुअंक 20 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक क्रियाशील आहे? धातू ‘अ’ची विरल HCl आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा.

उत्तर –

4) पुढील समीकरण पायरीपायरीने संतुलित करून लिहा.

H2S2O7 + H2O → H2SO4

5) सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(i) सोबतच्या आकृतीत दर्शवलेले उपकरण ओळखा.
(ii) या उपकरणाचा उपयोग लिहा.
(ii) या उपकरणात ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते ते लिहा.

 

6) ‘उपग्रहाची भ्रमणकक्षा’ म्हणजे काय ? त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते ?

7) पुढील परिच्छेदात दिलेली प्रक्रिया ओळखून ती दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा :
ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे (द्रवणांक 2000 °C) स्टीलच्या टाकीमध्ये विदयुत अपघटन केले जाते. या टाकीच्या आतील बाजूला ग्रॅफाइटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या विदयुत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बन (ग्रॅफाइट) च्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम. द्रवणांक 1000 °C पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट (Na3 AlF6 ) आणि फ्ल्युअरस्पार (CaF2) मिसळले जाते.

8) आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(i) A या चौकटीत दर्शवलेला खंड ओळखून त्या खंडातील कोणत्याही एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
(ii) B या अक्षराने दर्शवलेला मूलद्रव्याचा खंड ओळखून कितव्या आवर्तनात आहे ते लिहा; तसेच त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2023 । ssc maharashtra board science 1 question paper 2023 with solution

प्रश्न. 4 था. पुढील उपप्रश्न सोडवा : (कोणताही एक) गुण : 5

1) पुढील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानांतील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते, तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

(i) उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते?
(ii) अशा स्थितीत आपणांस उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो ?
(iii) ते तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल?
(iv) या तत्त्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो ?

2) पुढील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(i) आकृतीत दर्शवलेली भिंगाची रचना कोणत्या दर्शकामध्ये आढळते? 1
(ii) या दर्शकाचे कार्य कसे चालते ते थोडक्यात लिहा.
(iii) या दर्शकात विभिन्न विशालन कसे मिळवता येते?
(iv) आकृतीला योग्य नावे देऊन आकृती पुन्हा काढा.

दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam  IMP Questions

खालील दिल्याप्रमाणे तुम्ही या pdf  डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे आपण जसे याठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF उपलब्ध  केलेल्या आहेत तशाच इतर  विषयांच्या इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स |  IMP Notes Pdf देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?

जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात माहिती मिळेल.

तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.

इयत्ता-दहावी-विज्ञान-महत्वाच्या-नोट्स Class 10 Science Notes PDF Free To Download. SCERT Educational Study Material.

इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान pdf | मराठी माध्यम

2018 इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका
विज्ञान आणि तंत्रज्ञान 1 pdf 

—————————————————————————
2018 इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका
विज्ञान आणि तंत्रज्ञान 2 pdf 

————————————————————————————————–

2019 इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान 1 pdf 

—————————————————————————————————

2020 इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान 1 pdf 

—————————————————————————————————

2020 इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान 2 pdf 

इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 pdf 2018-2019-2020

दहावी विज्ञान भाग 1

कारणे द्या PDF

शाब्दिक गणिते PDF

बहुपर्यायी प्रश्न

*************************************

प्रकरण-निहाय बहुपर्यायी प्रश्न 16-03-2023

आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे

मागील बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान

बोर्डाला आलेले प्रश्न उत्तरासहित

********************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here