Home मराठी व्याकरण मराठी व्याकरण समास _samas in marathi grammar

मराठी व्याकरण समास _samas in marathi grammar

192
0
samas in marathi grammar
samas in marathi grammar

मराठी व्याकरण समास _samas in marathi grammar

आज आपण या लेखात मराठी व्याकरण समास या घटकाचा अभ्यास करणार आहोत इयत्ता दहावी मराठी कुमारभारती या विषयाच्या कृतीपत्रिकेत samas in marathi grammar समास हा व्याकरण घटक विचारला जातो.

समास म्हणजे काय ?

समास हा शब्द सम् + अस् या संस्कृत धातूपासून तयार झाला त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. आपण रोजच्या बोलण्यात प्रत्येक शब्द वेगवेगळा न बोलता काही वेळा दोन शब्द एकत्र बोलतो.
samas in marathi grammar

उदा. बटाटेवडा, राजपुत्र, नारळीभात,

बटाटेवडा —  बटाटे घालून तयार केलेला वडा.

राजपुत्र  — राजाचा पुत्र

वनभोजन  — वनातील भोजन

महाराष्ट्र  — महान असे राष्ट्र

क्रीडांगण  — क्रीडेसाठी अंगण ……….असे आपण जोडशब्द बोलतो.

जेव्हा दोन शब्दांमधील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकत्रीकरणाला ‘समास ‘असे म्हणतात.
samas in marathi grammar

अशा प्रकारे तयार झालेल्या जोडशब्दाला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.

शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.

(समास = एकत्र करणे, दोन शब्द जोडणे)

विग्रह = कोणत्याही सामासिक शब्दाची फोड करणे म्हणजेच त्यातील मूळचे दोन शब्द त्यांच्यातील परस्परसंबंध दाखवणाऱ्या प्रत्ययांसहित किंवा शब्दांसहित स्पष्ट करून दाखविणे यालाच समासाचा विग्रह असे म्हणतात.

सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला’ विग्रह’ म्हणतात.

( तो शब्द कसा तयार झाला.)

मराठी उपयोजित लेखन_ बातमी लेखन

मराठी उपयोजित लेखन_ जाहिरात लेखन

समासाचे प्रकार कोणते ?

मराठी व्याकरण समास व समासाचे प्रकार

समासात दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. एकत्र येणाऱ्या या शब्दांपैकी कोणत्या पदाला महत्व असते. त्यावरून समासाचे प्रकार पडतात.

samas kitne prakar ke hote hain

अव्ययीभाव समास 

अव्ययीभाव समास : यात पहिले पद प्रमुख असते. काही वेळा पहिले पद अव्यय असते. कधी ते उपसर्ग असते तर कधी कधी नामही असते. संपूर्ण सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो.

ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते. व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो. त्या समासास अव्ययीभाव समास म्हणतात.

उदा.

  • प्रतिक्षण  — प्रत्येक क्षणाला.
  • गैरहजर  — हजेरी शिवाय.
  • आमरण  — मरेपर्यंत,
  • प्रतिमास  — प्रत्येक महिन्याला
  • आकर्ण  — कानापर्यंत,
  • आकंठ  — कंठापर्यंत,
  • गावोगाव  — प्रत्येक गावी.
  • दररोज  — प्रत्येक दिवशी.

आजन्म, यथाशक्ती, प्रतिवर्षी, घडोघडी, बिनधास्त, बेभान, बिनचूक, दिवसेंदिवस, तासनतास, हरघडी, पानोपानी, बिनधोक, घरोघर, गल्लोगल्ली, पावलोपावली.

तत्पुरुष समास 

• तत्पुरुष समास या समासात दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते. समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप झालेला असतो. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात.

उदा.

  • राजवाडा  —  राजाचा वाडा                           राजा + वाडा
  • राजपुत्र    —   राजाचा पुत्र                            राज + पुत्र         
  • पुरणपोळी  —   पुरण घालून तयार केलेली पोळी    पुरण + पोळी
  • नवरात्र   —  नऊरात्रींचा समूह                        नव + रात्र 

इयत्ता दहावी मराठी  कुमारभारती या विषयाच्या सुधारित कृतीपात्रिका आराखड्यानुसार खालील समासाचे प्रकार विचारले जातात यासाठी आपण खालील समासांचा अभ्यास करूया 

कर्मधारय समास

कर्मधारय समास : ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते, दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास म्हणतात.

उदा:

  1. नीलकमल नील      +    कमल ( निळे कमळ )
                          ↓             ↓
                      विशेषण    +     नाम

      विग्रह — नील असे कमल.

  1. मातृभूमी    मातृ       +      भूमी ( मातेसारखी भूमी )
                          ↓               ↓
                       विशेषण    +      नाम

                   विग्रह — भूमी हीच माता

महादेव   — महान असा देव,
घननील   — निळा असा घन,
विदयाधन  — विद्या हेच धन,
काव्यामृत — अमृतासारखे काव्य.

वैशिष्टये :-

  • दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. 
  • कधी पूर्वपद विशेषण असते, नीलकमल, रक्तचंदन, पीतांबर,
  • कधी उत्तरपद (दुसरेपद) विशेषण असते. घननील, पुरुषोत्तम, भाषांतर.
  • कधी दोनही पदे विशेषण असतात. श्यामसुंदर, हिरवागार, पांढराशुभ्र.
  • कधी पूर्वपद उपमान असते. कमलनयन, मेघश्याम, चंद्रमुख,
  • कधी उत्तरपद (दुसरेपद) उपमान असते. चरणकमल, नरसिह.
  • कधी दोन्ही पदे एकरुप असतात, विद्याधन, काव्यामृत, भवसागर,

    मराठी उपयोजित लेखन_ पत्रलेखन

    कवितेचे रसग्रहण करताना एक अभ्यास

द्विगू समास :

द्विगू समास : ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरुन समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा त्यास द्विगू समास असे म्हणतात.

उदा:

  1. त्रिकोण   त्रि (तीन)      +       कोन  ( तीन कोन )
                         ↓                    ↓
                    संख्याविशेषण    +       नाम

           विग्रह — तीन कोनांचा समूह


  1. नवरात्र   —    नऊ     +      रात्र  ( नऊ रात्री  )
                          ↓              ↓
                    संख्याविशेषण   +   नाम

    विग्रह —  नऊ रात्रींचा समूह 

वैशिष्टये :

  • पूर्वपद संख्यावाचक
  • दुसरेपद नाम 
  • सामासिक शब्दावरुन एका समुच्चयाचा बोध होतो. 
  • हा समास नेहमी एक वचनात असतो.

उदा.

  • अष्टाध्यायी  — आठ अध्यायांचा समूह
  • पंचपाळे  — पाचपाळयांचा समूह
  • द्विदल  — दोन दलांचा समूह
  • बारभाई  —  बारा भाईंचा समूह
  • त्रैलोक्य  —  तीन लोकोचा समूह
  • त्रिभुवन  —  तीन भुवनांचा समूह,
  • पंचवटी  —  पाच वटांचा समूह,
  • नवरात्र  —  नऊरात्रींचा समूह

      पंचप्राण, पंचारती, चौखूर, बारभाई, पंचज्योती, पाचुंदा, सप्तसिंधू


द्वंद्व  समास :

ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्टया प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. या समासात आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात.

उदा.

  • रामलक्ष्मण  —   राम आणि लक्ष्मण,
  • पासनापास  —  पास किंवा नापास,
  • दिवसरात्र   —    दिवस आणि रात्र
  • खरेखोटे    —  खरे किंवा खोटे.

द्वंद्व समासाचे उपप्रकार :
द्वंद्व समासातील सामासिक शब्दाच्या विग्र्हाच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे खालील प्रकार पडतात.

  • इतरेतर द्वंद्व समास :
    ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व, या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.

 उदा.

  • नाकडोळे —  नाक आणि डोळे,
  • सुंठसाखर —  सुंठ आणि साखर,
  • अहिनकूल — अहि व नकूल
  • कृष्णार्जुन — कृष्ण आणि अर्जुन,
  • विटीदांडू  —  विटी आणि दांडू,

          दिवसरात्र, भाऊबहिण, डोंगरदऱ्या, आवडनिवड, कौरवपांडव, मायलेक, सुईदोरा.

वैकल्पिक द्वंद्व समास :
 ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या विकल्पबोधक बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्या समासाला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
उदा.

  • बरेवाईट  —    बरे किंवा वाईट
  • सत्यासत्य  —  सत्य किंवा असत्य
  • पासनापास  — पास किंवा नापास, 
  • कटिखांदी —   कटी किंवा खांदी,
  • चारपाच  —   चार किंवा पाच,
  • धर्माधर्म  —  धर्म किंवा अधर्म,
    भेदाभेद, निंदास्तुती, खरेखोटे, चूकभूल, उंचसखल.

 समाहार द्वंद्व समास :
 या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचा ही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात

उदा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here