[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide
सकारात्मक विचार करणारा युगपुरूष संसाराला मार्गदर्शन करून ज्ञानरूपी सावली देतो.
नरेंद्र (स्वामी विवेकानंदाचे लहानपणाचे नाव) यांचे वडील विश्वनाथबाबू यांच्याकडे एक घोडागाडी होती ती हाकण्यासाठी एक रुबाबदार उंच पुरा गाडीवान त्यांनी ठेवला होता. त्याला निळा पोषाख, डोक्याला पटका, कमरेला पट्टा, शर्टावर बिल्ला या ड्रेसकोडमध्ये तो गाडीवान अत्यंत रूबाबदार दिसे. त्याचे रूप व गाडी चालविताना ऐटबाज बैठक नरेंद्रला मोहीत करीत असे. एकदा विश्वनाथबाबूंनी नरेंद्राला विचारले, ‘बाळ तू मोठेपणी कोण होणार?’ नरेंद्र म्हणाला, ‘मी आपल्या गाडीवानासारखा होणार? व ऐटीत गाडी हाकणार.” विश्वनाथबाबूंना अत्यंत वाईट वाटले. आपण ज्याच्यासाठी कष्ट उपसतो तो गाडीवान होण्याची स्वप्न पाहातो. ते खिन्न झाले. त्याला काय सांगावे हे त्यांना सुचेना. नरेंद्रच्या आईने हा सगळा संवाद ऐकला.
नेहमी सकारात्मक विचार करणारी आई म्हणाली, ‘बाळा नरेंद्रा, तू अवश्य गाडीवान हो, पण तो गाडीवान कसा?’ असे सांगून भितींवर टांगलेल्या चित्राकडे तिने बोट दाखविले. त्या चित्रात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत. त्या कृष्णासारखा तू सारथी हो. अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकीत असताना त्याने अर्जुनाला जे ज्ञान दिले तसेच तुही या जगाला मार्गदर्शन कर”.
आईचा हा आशीर्वाद छोट्या नरेंद्राने शिरसांवद्य मानला व मोठेपणी भारतीय संस्कृतीची पताका जगभर फडकवली. संसाराला ज्ञानरूपी सावली दिली.
अशा आणखी कथा येथे वाचा...
- [सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide
- [ बालपण शास्त्रज्ञांचे ] The childhood of scientists
- [ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner
- [ मराठी- कथा ] हजरजबाबीपणा व कल्पकता marathi kathaa hajarjababipna kalpkta
- [ मराठी बोधकथा ] एक महान वक्ता marathi bodhkatha ek mahan vktaa
- [ मराठी बोधकथा ] स्वतःला ओळखा marathi bodhkatha swthala olkhaa
- [मराठी बोधकथा] साथ,सोबत आणि संगत.. marathi bodhkatha saath, sobt aani sangat..
Nice