Home ९ वी बालभारती नात्यांची घट्ट वीण natyanchi ghatta vin iyata navvi Marathi

नात्यांची घट्ट वीण [इयता नववी कुमारभारती] natyanchi ghatta vin iyata navvi Marathi

69
3

नात्यांची घट्ट वीण [इयता नववी कुमारभारती] natyanchi ghtta vin iyata navvi Marathi
(इयत्ता नववी कुमारभारती पाठ्यपुस्तक पान क्रमांक १०,११,१२ ) 

-मीरा शिंदे

मीरा शिंदे या प्रसिद्ध लेखिका असून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे लेखन प्रसन्न व प्रभावी असते. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकांनी माणसामाणसांमधील नात्यांचे वर्णन केले आहे. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो माणसांच्या सोबत व त्यांच्या आधारानेच जगत असतो. साहजिकच, या माणसांशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच नाते होय. या नात्यांमधील काही नाती ही जन्मामुळे प्राप्त होतात, तर काही नाती सहवास वा वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखिकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे.
प्रस्तुत पाठ ‘ आवाम’ २०१० या मासिकातून घेतला आहे.


पाठात आलेले शब्दार्थ
  • वीण – कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या व आडव्या धाग्यांची रचना.
  • विश्वात्मक – संपूर्ण विश्वाचा समावेश असणारे.
  • जवळीक – आपुलकी.
  • भवसागर – (भव = आपल्याला दिसणारे, जाणवणारे आपल्या अवतीभवतीचे विश्व) भवरूपी सागर.
  • सेतू – पूल
  • उलघाल –  उलथापालथ, धांदल, गोंधळ, कालवाकालव, तगमग, तळमळ.
  • सृजन – नवनिर्मिती.       
पाठात आलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
  • मात करणे- पराभूत करणे.
  • जवळीक साधणे – सलगी प्राप्त करणे, मैत्री मिळवणे.
  • तारेवरची कसरत करणे – कोणताही निर्णय घेताना प्रचंड गोंधळ होणे, घेतलेल्या निर्णयाला धरून राहताना प्रचंड तारांबळ उडणे.
  • जिवाची उलघाल होणेकाळजीने अस्वस्थ होणे.
  • कात टाकणेजुन्या गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे नवीन स्वरूप धारण करणे.
  • पिकलं पान गळणं – मृत्यू पावणे, शेवट होणे.
  • नवी पालवी फुटणे – नवे स्वरूप मिळणे, नवा जन्म मिळणे.

(१) नाळ : बाळ आईच्या पोटात वाढते. त्या वेळी बाळाच्या बेंबीतून एक नलिका येते. ती नलिका आई व बाळ यांना जोडते. या नलिकेला नाळ म्हणतात. या नाळेतून आईकडून बाळाला सर्व जीवनरस मिळतो आणि त्याचे पोषण होते.

(२) कानमंत्र : मुलगा साधारणपणे आठ वर्षांचा झाला की, त्याला गुरूकडे शिक्षणासाठी पाठवले जाई. शिक्षणासाठी त्याला गुरूकडेच राहावे लागे. त्याची एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होई. गुरुगृही जाण्यापूर्वी त्या मुलाची मुंज केली जाई. या मुंजीत एक महत्त्वाचा विधी असे. पुढील आयुष्यात उपयोगी पडेल अशी महत्त्वाची गोष्ट वा महत्त्वाचा सल्ला मुलाच्या कानात वडील सांगत असत. यालाच कानमंत्र असे म्हणतात. हा कानमंत्र मुलाच्या कानातच आणि इतर कोणालाही ऐकू जाणार नाही, अशा रितीने सांगितला जाई. यावरून गुपचूप दिलेल्या सल्ल्याला कानमंत्र म्हटले जाऊ लागले. ‘मननात त्रायते इति मन्त्रः ।’ ही मंत्राची व्याख्या आहे. ज्याचे सतत मनन केल्याने आपले रक्षण होते, त्याला ‘मंत्र’ म्हणतात.


लेखिका मीरा शिंदे यांनी पाठा संदर्भात मांडलेले विचार येथे पहा 

स्वाध्याय
कृती : आकलन कृती 

natyanchi vin - 1

natyanchi vin - २


*. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा: 
(अ) ‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.
उत्तर:
असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.
(आ) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.
उत्तर:
मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून ‘बाप’ नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.


खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा:

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
 

 

उत्तर:

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
तारुण्यात अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनाविकारांनी मन व्यापलेले असते. विविध भावनाविकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ, निकोप बनून जाते.

 

कृती :   स्वमत / अभिव्यक्ती

 कृ. १. नातंया अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
उत्तर :
मनुष्य हा अनेक नात्यांच्या बंधनात गुंफला गेलेला असतो. ‘नातं’ ही दृश्य वस्तू नाही, तर एक बांधिलकीची भावना आहे. एकच भावना असली तरी प्रत्येक नात्यापरी त्याला विविध छटा प्राप्त होतात. आईचे प्रेम, आजीचे वात्सल्य, वडिलांची माया ही सर्व प्रेमाची, स्नेहाची वेगवेगळी रूपे या विविध नात्यांतून अनुभवता येतात. मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यातून जाणवणारी मैत्रीची, दोस्तीची भावना ज्याला अनुभवास येते, त्याचं आयुष्य एका निखळ आनंदानं भरून जातं. भाऊ-बहीण यांच्याबरोबरच्या नात्यातून स्नेह, कौतुक, आपलेपणा या भावना जाणवून येतात. गुरू-शिष्याच्या नात्यात आदरयुक्त प्रेमाचा अनुभव येतो. ही सर्व नाती अमूर्त असली, म्हणजेच डोळ्यांना दिसत नसली, तरी मनाला जाणवतात, अनुभवता येतात. प्रत्येक नात्यातून जाणवणारी भावनेची एक एक छटा आपल्या आयुष्यात रंग भरत जाते, त्यामुळे नातं ही संकल्पना एखादया अगणित पाकळ्या असलेल्या फुलाप्रमाणे बहुरंगी आहे.

कृ. २. माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: माणूस जन्माला आल्यापासून अनेक नाती जोडत असतो. या नात्यांचा, त्यामुळे जोडल्या जाणाऱ्या माणसांचा आपल्यावर प्रभाव पडतो. आपल्या कळत नकळत अवतीभवतीच्या माणसांमधील गुण, त्यांचे संस्कार आपण घेत असतो. याचे उत्तम व सर्वांना परिचित उदाहरण म्हणजे साने गुरुजी. आईने दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच श्यामचा पुढे एक आदर्श शिक्षक व समाजसेवक होऊ शकला. लहानपणी आईने रुजवलेले सेवाभाव, भेदाभेद न करणे, प्रेम, ममता हे सर्व गुण श्यामच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाले. अगदी सामान्य माणूससुद्धा आई-वडील, मित्र इत्यादी नात्यांतून काही ना काही शिकतच असतो. गुरूकडून ज्ञान प्राप्त होते, तर आई-वडिलांकडून निर्व्याज प्रेम करण्याची कला आपण शिकतो. त्यांच्या सहवासात त्यांचे गुण आपण शिकतोच; पण त्यांनी जागरूकपणे आपल्याला शिकवलेल्या अनेक गोष्टी आपण आयुष्यभर आपल्या व्यक्तिमत्त्वात बाणवतो. अगदी उतारवयातही आजी-आजोबा आपल्या नातवंडांना संस्कारांची शिदोरी देतात, त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नाती ही माणसाचे जीवन अनुभवसमृद्ध करत असतात.

कृ. ३. मित्र दिसला, तरी मैत्रीचं नातं दिसत नाहीया विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः मैत्री ही अमूर्त भावना आहे. ते एक नाते आहे. भौतिक वस्तूंप्रमाणे ती आपल्याला नजरेला दिसत नाही; परंतु असे असले, तरीही आपण तिचे अस्तित्व नाकारू शकत नाही. आपल्या मित्राला संकटसमयी साथ देणे, त्याच्यासोबत तासन्तास गप्पा मारणे, प्रत्येक गोष्ट त्याला सांगण्याची इच्छा होणे या सर्वांतूनच मैत्री जाणवत असते. मित्र अगदी रोज सहवासात नसला, कित्येक महिने भेट झाली नसली, तरी त्याच्याविषयी वाटणाऱ्या स्नेहातून, काळजीतून मैत्रीचे नाते जाणवत असते, म्हणजेच मैत्री ही नेमकी दाखवता येत नाही; परंतु तिचे अस्तित्व मात्र जाणवत राहते.

कृ. ४. नात्यांची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : आपला जन्म होतो, त्याच क्षणी आपल्याला काही नाती लागतात. आई-वडील, मुलगा-मुलगी, बहीण-भाऊ, नात-नातू, आजी-आजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात. ही नाती मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. ही नाती आपोआप मिळतात. सुरुवातीच्या काळात तर हीच नाती, म्हणजे या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली, स्वकीय व अगदी जवळची असतात. शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात. या नात्याने बांधलेली माणसे सुरुवातीला दूरची किंवा परकीय असतात. हळूहळू विविध प्रसंगांतून किंवा एकमेकांशी होणाऱ्या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावामुळे, त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद बनतो, हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मृदुमुलायम बनते. नात्यांना असे विविध रंग असतात, विविध आकार असतात.

कृ. ५. तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे / मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभवता, ते सविस्तर लिहा.
उत्तर: माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचे नाव मेघना. मैत्री या शब्दांचा अर्थ नीटसा उमगतही नव्हता तेव्हापासून, म्हणजे इयत्ता पहिलीपासूनची आमची मैत्री. त्या वयात एकत्र खेळणे, डबा खाणे व एकाच बाकावर बाजू-बाजूला बसणे हीच आमच्यासाठी मैत्रीची व्याख्या होती. दोघींपैकी एक शाळेत आली नाही, तर दुसरीला चुकचुकल्यासारखे वाटे. पुढे वयासोबत आमची मैत्रीही दृढ होत गेली. माझ्यासाठी मैत्री निभावणे म्हणजे माझ्या मित्र-मैत्रिणींना, त्यांच्या सुख-दुःखात निरपेक्षपणे साथ देणे; किंबहुना मैत्री हे एकच नातं असं आहे, जिथे समोरच्या माणसाच्या अपेक्षांचं ओझं आपल्यावर नसतं. हे नातं रक्ताच्या नात्यासारखं जन्मामुळे जोडलं जात नाही, ते आपल्या आवडी-निवडी, स्वभाव जुळल्यावर जोडलं जातं. त्यामुळेच खऱ्या मित्र-मैत्रिणींना एकमेकांची मनोवस्था, समस्या, दुःखं ही न सांगताच समजतात. एकवेळ मित्राच्या आनंदात सहभागी होता आले नाही तरी त्याला मदतीची गरज असताना त्याला साथ देणे हीच माझ्यासाठी खरी मैत्री आहे.

कृ. ६. वडील आपले अश्रू इतरांपासून का लपवत असतील, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर: एखादया कसोटीच्या किंवा दुःखद प्रसंगी घरातील सदस्य अश्रूंवाटे आपल्या भावना व्यक्त करतात; मात्र वडील आपले अश्रू इतरांपासून लपवतात. संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर असते, त्यामुळे वडील कमकुवत पडल्यास संपूर्ण घर कोलमडून जाते. वडिलांच्या डोळ्यांत अश्रू पाहून इतरांचाही धीर सुटू शकतो, म्हणूनच संपूर्ण कुटुंबाला आधार देण्यासाठी कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी, त्यांना ठाम उभे राहावे लागते. डोळ्यांत अश्रू आले, तरी ते त्यांचे त्यांनाच पुसावे लागतात. तेही कोणाच्याही नकळत! मुलांच्या भल्यासाठी अनेकवेळा वडिलांना कठोर व्हावे लागते आणि या कठोर व जबाबदारीच्या मुखवट्यामागे वडिलांची माया लपली जाते.

 कृ. ७. तुमच्या आयुष्यात नकळत जोडल्या गेलेल्या एखादया नात्याबद्दल तुमच्या शब्दांत माहिती दया.
उत्तर: दरवेळी जोडली जाणारी नाती ही माणसांचीच असतात, असे नाही. कधी एखादया वस्तूशी, तर कधी प्राण्यांशी आपली नाती जुळतात. नात्यांमध्ये जाणवणारा आपलेपणा, ममत्व कोणाशीही जुळू शकते. मी इयत्ता सातवीत असताना एकदा शाळेतून आल्यावर पाहते, तर बाबांनी एक गोंडस कुत्र्याचे पिल्लू आणले होते! त्यांना वाटेत थंडीने कुडकुडत असलेले सापडलेले ते! यापूर्वी मी प्राण्यांशी कधी जवळून खेळलो नव्हतो. पहिल्यांदा त्या पिल्लाला हात लावला, तो भीतभीतच; पण थोड्याच दिवसांत आमची दोघांची गट्टी झाली. मी त्याचे नाव बंटी ठेवले. बंटी आणि मी जणू एकमेकांचे जिवलग मित्र झालो. एकत्र खेळणेच नव्हे, तर झोपतानाही तो आपला बिछाना सोडून माझ्याजवळ, पायाशी येऊन झोपतो. त्याला बरे नसले, की मी अस्वस्थ होतो आणि मी आजारी असलो, की तोही शांतपणे माझ्याजवळ बसून राहतो. अशाप्रकारे, दोन जिवलग मित्रांसारखे निखळ व घनिष्ट मैत्रीचे नाते आमच्यात निर्माण झाले आहे.


आभार

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here