NAS | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण |
NAS विषयी थोडक्यात
शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत १२ नोव्हेंबर २०२९ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण एकाच दिवशी संपूर्ण देशात होणार आहे. हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पतींमधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेचे मूल्यांकन करणे यासाठी करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, समावेशित साधन व्यक्ती केंद्रप्रमुख उच्च माध्यमिक शिक्षक यांची क्षेत्रीय अन्वेषक म्हणून निवड करण्यात येते.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण ( NAS ) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना.
१. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) करण्यात येणार आहे.
२. सदर सर्वेक्षण इयता ३ री. ५ वी ८ वी. १० वीच्या वर्गांचे करण्यात येणार आहे.
३. यासाठी इयता ३री ५ ची ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randum (Sampling) निवडली जाते,
४. कोणती शाळा त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे, हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल.
५. निवड केलेल्या शाळांची यादी केंद्राकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळविण्यात येईल,
६. यामध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करताना केला जातो.
७. इयता ५ वी. ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते,
८. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणाच्या दिवसासह इयत्ता ३ री ५ वी. ८ वी व १० वी चे वर्ग असणाऱ्या मात्र सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या शाळा दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु राहतील.
९. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल. शाळा प्रमुखांनी सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व स्टाफ सहित सकाळी ७ बाजता शाळेवर उपस्थित रहावयाचे आहे. कारण क्षेत्रीय अन्वेषक आणि निरीक्षक अनुक्रमे सकाळी ७.३० व ८.३० वाजता शाळेवर उपस्थित राहणार आहेत.
१०. निवडलेल्या शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे, त्या वर्गाची स्वच्छता, बैठक व्यवस्था हॅन्ड सॅनिटायझर सुरक्षित अंतर राहील, अशी बाकांची व्यवस्था करावी.
११. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.
१२. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Ramdoen Sampling-draw Method) निवडली जाईल
१३. चाचणीसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.
१४. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.
१५. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधी निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वांना अवगत करावे,
१६. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्ह्याचा नमुना/शाळेचा नमुना कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात.
१७. दिनांक १० ते ११ नोव्हेंबर २०२१ यापैकी एक दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणी साठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत, तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे,
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण अधिक माहितीसाठी https://nas.education.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपेढी
National ACHIEVEMENT Survey Test | Question paper | Question Bank
सदर प्रश्नसंच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांनी संकलित केले आहे. ही बाब स्तुत्य आहे. प्रस्तुत प्रश्न पेढीमध्ये इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्नरचना करण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होईल.
इयत्ता |
Downloas Link |
पहिली | NAS Question Paper Bank |
दुसरी | NAS Question Paper Bank |
तिसरी | NAS Question Paper Bank |
चौथी | NAS Question Paper Bank |
पाचवी | NAS Question Paper Bank |
सहावी | NAS Question Paper Bank |
सातवी | NAS Question Paper Bank |
आठवी | NAS Question Paper Bank |
NAS Exam previous year Question Paper
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2017
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप खालील प्रमाणे आहे जॉईन व्हा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
ग्रुप नाव – www.marathistudy.com
www.marathistudy.com Group | Join links |
---|---|
www.marathistudy.com-1 | Join |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Nice Study
Nice
Shlok patil Nice Website
Very good
Nice
Nice Website