पाठातील मह्त्त्वाचे मुद्दे |
१) लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे, ‘भारत माझा देश आहे’, ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना खूप आनंद झाला.
(२) आपण देशावर प्रेम करतो, याचा अर्थ काय ? आई मुलावर प्रेम करते म्हणजे ती मुलाचे पालनपोषण करते आणि त्याला वाढवते. देशाचे पालनपोषण करणे आणि त्याचा गौरव वाढवणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय. (३) देश = देशाची भूमी + देशातील लोक. देशातील लोक म्हणजेच देशबांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर प्रेम करणे आणि देशबांधवांवर प्रेम करणे. (४) आता भगतसिंग, राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिवीरांप्रमाणे देशावर प्रेम करण्याची गरज नाही. त्या वेळी देश गुलाम होता. राज्यकर्ते परकीय होते. आता आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच राज्यकर्ते आहोत. देश संकटात असला तरच देशावर प्रेम करायचे असते, असे नाही. (५) देशबांधवांवर प्रेम करायचे म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांना मदत करायला धावायचे. (६) शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतींद्वारे आपण देशावर प्रेम करू शकतो. ती कृती करताना तिचा देशबांधवांवर कोणता परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे. देशबांधवांचे भले होईल अशीच कृती आपण केली पाहिजे. (७) आपल्या कृतीत देश बांधवांविषयी आत्मीयता असेल तर आपली कृती देशप्रेमाची ठरते. आपल्या मनात स्वतःविषयी जशी आत्मीयता असते, प्रेम असते, , तशीच आत्मीयता, प्रेम देशबांधवांविषयी असले पाहिजे. देशबांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता व आपुलकी देणे म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता असणे होय. हेच देशप्रेम आहे. |
[expander_maker id=”1″ more=”Read more” less=”Read less”]
प्रश्न १ ला : पाठच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा |
प्रतिज्ञा :
प्रतिज्ञा म्हणजे धोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणांची बाजी लावण्याची आपली तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय.
|
सस्यश्यामला माता :
सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो.म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणीमाता म्हणजे सस्यश्यामला माता’ होय.या शब्दांतून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते.
|
mazya deshavar maze prem aahe swadhyay 8th
प्रश्न २ रा : खालील आकृत्या पूर्ण करा. |
प्रश्न ३ रा : खालील विचार कोणाचे ते लिहा. |
विचार | व्यक्ती |
(अ) ‘भारतमाता’ म्हणजे भारतातील सर्व लोक. | (१) पंडित जवाहरलाल नेहरू |
(आ) ‘प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही’. | (२) महात्मा गांधी |
(इ) ‘खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे.’ | (३) साने गुरुजी |
प्रश्न ४ था : तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. |
(अ) प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर ➤ माझ्या वाढदिवशी मी प्रतिज्ञा केली होती.रोज नियमाने सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. पहिल्याच दिवशी मीखरोखरच खूप अभ्यास केला. पाठ्यपुस्तक वाचत बसलो,बसलो ते बसलोच.अन्य विषयाचागृहपाठ शिल्लक राहिला.सरांना मीकारणसांगितले. त्यांना आनंद झाला.तेरागावलेच नाहीत.त्यांनी एकसूचना केली. वेळापत्रक तयार कर.” मी वेळापत्रक करायला घेतले.मनासारखे होतच नव्हते. माझे मित्र तर हसायला लागले. गणिताला एवढाच वेळ ? “विज्ञानाला आणखी वेळ दिला पाहिजे.” मराठी विषय दिसायला सोपा. पण लिहिताना वेळ पुरतच नाही, मित्रांचे असे शेरे ऐकल्यावर मौ गांगरूनच गेलो. कागदच्या कागद मी फाडून टाकत होतो.प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा वेळापत्रकात माझा वेळ जाऊ लागला.शेवटी सरांनीच मला वेळापत्रक तयार करायला शिकवले.आता मी त्यानुसार अभ्यास करत पण काही प्रमाणात तरी प्रतिज्ञा यशस्वी झाली आहे.
|
(आ) तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा.
उत्तर➤ आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. आई,बाबा, मी आणि दादा असे आम्ही चौघेजण होतो.फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो.तेवढ्यात फुलपाखरांचा धवाच दिसला.ती फुलपाखरे पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो अन् अचानक माझा पाय एका सापावर पडला.त्याने फुस्कारून माझ्या पायाचा चावाच घेतला. एकदोन क्षणांचाच प्रकार होता तो.माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली.”साप,साप मी मोठ्याने किंचाळलो. तो चावण्याचीजागा स्पष्ट दिसत होती.रक्तवाहत होते.आई। ताडकन धावली. डॉक्टरांना आणा असे ओरडून तीजखमेतून येणारे रक्त शोषूलागली.ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुकायची. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले.जखम घुतली.आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो, केवळ आईच्या प्रयत्नांमुळे.आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते. याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला.
|
खेळूया शब्दांशी. | ||||||
(अ) समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.
1) दंगा – दंगामस्ती
2) कोड – कोडकौतुक
3) थट्टा – थट्टामस्करी
4) धन – धनदौलत
5) बाजार – बाजारहाट
|
||||||
(आ) ‘गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.
1) मी, आपण, रत्ना, त्यांचे
उत्तर➤ रत्ना कारण इतर सर्व सर्वनाम आहेत आणि रत्ना हे नाम आहे.
2) राहणे, वाचणे, गाणे, आम्ही
उत्तर➤ आम्ही कारण इतर सर्व क्रियापद आहेत आणि आम्ही हे स नाम आहे.
3) तो, हा, सुंदर, आपण
उत्तर➤ सुंदर कारण इतर सर्व सर्वनाम आहेत आणि सुंदर हे विशेषण आहे.
4) भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे
उत्तर➤ करणे कारण इतर सर्व विशेषणे आहेत आणि करणे हे क्रियापद आहे.
|
||||||
(इ) खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.
गाव,गावे,देश,काम,शेला,सणंग,मुलगा,मूल,मुले,आई,यंत्र,रेल्वे,विश्व,शक्ती,भूमी,चित्र,हवा,पाणी,निसर्ग,गीत,भाषा
|
||||||
(ई) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
गगनभेदी घोष करणे, रचनात्मक काम करणे, पोटापलीकड पाहणे, कचाट्यात सापडणे
(1) गगनभेदी घोष करणे :
वाक्य: भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय’ असा गगनभेदी घोष केला.
(२) रचनात्मक काम करणे :
वाक्य: रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणणे कर्मवीर भाऊराव पाटीलयांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले. (3)पोटापलीकडे पाहणे :
वाक्य: मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे.
(4 ) कचाट्यात सापडणे :
वाक्य: शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शारा शिक्षण घ्यावे की वाणिज्य शिक्षण घ्यावे,या कचाट्यात सापडले.
|
[/expander_maker]
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– |