Home Uncategorized हजरजबाबीपणा व कल्पकता  marathi kathaa hajarjababipna kalpkta

[ मराठी- कथा ] हजरजबाबीपणा व कल्पकता  marathi kathaa hajarjababipna kalpkta

70
0

हजरजबाबीपणा व कल्पकता
(आईनस्टाईन आणि ड्रायव्हरची गोष्ट)

हजरजबाबीपणा : कोणत्याही प्रश्नाला तिथल्या तिथे उत्तर सुचणे यालाच हजरजबाबीपणा असे म्हणतात.

  याबाबतीत आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाच्या ड्रायव्हरची गोष्ट मोठी समर्पक आहे.त्याचं असं झालं :

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन हे ठिकठिकाणी व्याख्याने देत हिंडत  होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या  ड्रायव्हरलासुद्धा जायला लागत असे.

  आईन्स्टाईन हे शास्त्र आणि त्यांच्या संशोधनावर (ऊर्जाविषयक, अणुविषयक ) भाषणे करीत आणि मग भाषण संपल्यावर लोक त्यांना शंका विचारत आईन्स्टाईन त्या प्रश्नांची उत्तरे देत मग कार्यक्रम संपे.

 असे तीन-चार कार्यक्रम झाल्यानंतर अशाच एका कार्यक्रमाहून आईन्स्टाईन त्यांच्या गाडीतून ड्रायव्हरबरोबर परतत होते. तेव्हा आईन्स्टाईन ड्रायव्हरला म्हणाले,

“काय बाबा, कसं वाटलं माझं भाषण तुला?” 

 ड्रायव्हर लगेच उत्तरला

” त्यात काय वाटायचं, तुम्ही तर तेच भाषण सगळीकडे देत आहात. ऐकून ऐकून माझंही भाषण पाठ झालंं आहे. मी ते कुठेही करीन.”

  आईन्स्टाईन हे उत्तर ऐकून चकीत झाले. त्यांनी न चिडता खिलाडू वृत्तीने ड्रायव्हरचं हे म्हणूणंं स्वीकारलं आणि पटकन त्यांना एक कल्पना सुचली. ते म्हणाले :

 “हे बघ, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. प्रत्येक ठिकाणी नव काय बोलू? म्हणून तेच तेच बोलतो;  पण मलाही आता तेच तेच बोलून कंटाळा आला आहे. तेव्हा असं कर, आता तू बन आईन्स्टाईन आणि मी होतो तुझा ड्रायव्हर. पुढच्या ठिकाणचे लोक मला ओळखत नाहीत. तेव्हा मानसन्मान होईल. मला विश्रांती मिळेल.”

 झालं. आईन्स्टाईनने आणि त्यांच्या ड्रायव्हरने एकमेकांच्या भूमिकांची अदला-बदल केली आणि ते पुढच्या सभा स्थानाकडे गेले.

 तेथे लोक स्वागताला उभे होते. आईन्स्टाईनरुपी ड्रायव्हर खाली उतरला. लोकांनी त्याचे स्वागत केले आणि त्याला सभास्थानाकडे नेले आणि भाषणाची विनंती केली.

 तेथे त्याने अगदी आईन्स्टाईन त्यांच्या  ढंगात भाषण केलं लोक खूष झाली.आईन्स्टाईन चकित झाले. पण तेवढ्यात एका बाका प्रसंग ड्रायव्हरवर आला.

 लोक त्याला विज्ञानातल्या अवघड शंका विचारू लागले. स्वतः आईन्स्टाईन गडबडले. त्यांना वाटलं, आता भांडं फुटणार पण आईन्स्टाईनरूपी ड्रायव्हर गडबडला नाही. त्याने सर्व शंका ऐकल्या.

सर्व शंका ऐकून, आईन्स्टाईनरूपी ड्रायव्हर शांतपणे उत्तरला,                     

” या काय  शंका आहेत? अहो, असल्या सोप्या प्रश्नांची उत्तरे माझा ड्रायव्हरसुद्धा देईल.”

 आणि या त्याच्या हजरजबाबीपणाचा फायदा घेत ड्रायव्हररूपी आईन्स्टाईन स्वतः पुढे झाले आणि त्यांनी  श्रोत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. हजरजबाबीपणा अंगात असावा लागतो. ड्रायव्हरच्या हजरजबाबीपणामुळे त्याचे भांडं फुटलं नाही.

तर मित्रहो, असा असतो हजरजबाबीपणा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here