💥कर्मधारय समास 💥 |
⭐कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे.
⭐ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास ‘कर्मधारय समास’ असे म्हणतात.
उदा. महादेव (महान असा देव) घनश्याम (घनासारखा श्याम) यातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. यांतील दोन्ही पदांतील संबंध विशेषण-विशेष्य किंवा उपमान-उपमेय अशा स्वरूपाचा असतो.
उदा. रक्तचंदन (रक्तासारखे चंदन), मुखकमल (मुख हेच कमल) |
💥समास मुख्य पेजवर जा 💥 |