Home बोधकथा स्वतःला ओळखा marathi bodhkatha swthala olkhaa

[ मराठी बोधकथा ] स्वतःला ओळखा marathi bodhkatha swthala olkhaa

85
0

[ मराठी बोधकथा ] स्वतःला ओळखा marathi bodhkatha swthala olkhaa

किसन नावाचा एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. तो हिरवे, निळे, लाल आणि पिवळे असे विविध रंगाची फुगे विकायचा. अशा प्रकारे त्याचा उदरनिर्वाह चालत होता. एके दिवशी बाजारात फुगे विकत असताना विक्री कमी होऊ लागल्याने, तो अस्वस्थ झाला. खूप विचार केल्यानंतर त्याला एक उपाय सूचला थोड्या वेळाने सिलेंडर मधील हेलियम वायू भरलेला एक फुगा आकाशामध्ये त्याने सोडला. याचा परिणाम असा झाला की, आजूबाजूच्या मुलांना जवळपास फुगेवाला आला आहे, असे त्या उंच उडालेल्या फुग्यामुळे समजायचे. ते त्या फुगे वाल्याचा शोध घेत घेत त्याच्याजवळ यायची आणि फुगे विकत घ्यायची. तो असे नेहमी करायला लागला. असेच एकदा फुगे विकत असताना त्याच्या असे लक्षात आले की, कोणीतरी आपला शर्ट पाठीमागून ओढत आहे. त्याने पाठीमागे वळून पाहिल्यावर त्याला दिसलं की, एक अपंग मुलगा त्याच्या मागे उभा होता. त्या मुलाला त्याने विचारले की, तुला काय पाहिजे? तो मुलगा म्हणाला की, काका तुमच्याकडे असणारा हा काळा फुगा  इतर रंगाच्या फुग्याप्रमाणेच आकाशात उडेल का? मुलाच्या प्रश्नाने किसन ला कौतुक वाटले आणि प्रेमाने त्याला उत्तर दिले की, बाळ फुगा रंगानी उडत नाही, तर तो त्याच्या आतमध्ये असणाऱ्या हवेमुळे उंचच उंच उडतो.

तुम्ही यशस्वी व्हाल, तुमच्यातील असणाऱ्या गुणांमुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here