Home लेखन कौशल्य Kathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी

Kathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी

16
0

Kathalekhan Marathi | Story Writing In Marathi | कथालेखन मराठी

कथा म्हणजे ‘गोष्ट’. घडलेला प्रसंग, घटना कधीकधी ‘कथा’ म्हणून सांगितली जाते. ‘कथानक’ हा कथेचा आत्मा असतो. हे कथानक भूतकाळातील असते. त्यातून व्यक्तींच्या स्वभावाचे दर्शन घडते. कथा सांगण्याच्या पद्धतीवर कथेची परिणामकारकता अवलंबून असते. त्यात संवाद वापरले जातात व त्यातूनच कथा गतिमान होत राहते. भाषाशैली हेही कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते या मनोरंजकतेने कथा सांगितली जाते. तितकी तो श्रोत्यांच्या मनाची पकड घेते. कथेची भाषा, साधी, सरळ, सोपी व मनोरंजक असावी. माणूस हा सामाजिक, प्राणी आहे. त्यामुळे आपल्या कल्पना, भावना, आपले विचार, अनुभव इतरांना सांगावेत आणि आपण इतरांचे ऐकावेत, अशी माणसाला तीव्र इच्छा असते. त्यातूनच ‘कथा’ या लेखनप्रकाराचा जन्म झाला. ‘कथा’ हा निवेदन प्रधान साहित्य प्रकार आहे. या कथालेखनाचा परिचय व्हावा, म्हणून आपल्या अभ्यासक्रमात ‘कथापूर्ती’ या अभ्यास घटकाचा समावेश करण्यात आला आहे.’कथापूर्ती’ म्हणजे अपूर्ण कथा पूर्ण करणे म्हणजे अपूर्ण कथा दिली जाईल व ती पूर्ण करण्यास सांगितले जाईल.

Kathalekhan Marathi | Story Writing In Marathi | कथालेखन मराठी

‘कथालेखन’ ही एक कला आहे. ती सरावानेच आत्मसात होते. कथेतून आनंद मिळतो, विचारांना दिशा मिळते. कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलता यांच्या बळावर कथा रचली जाते. कथा ही पूर्णतः काल्पनिक किंवा सत्यघटनेवर आधारलेली असू शकते.कथाबीज हा कथेचा प्राण असतो आणि या कथाबीजावरच कथानक उभारले जाते. हे कथानक भूतकाळात घडलेल्या घटनांचे प्रसंगांचे असते. या घटना, प्रसंग, पात्र तर्कसंगत विचारांनी फुलवणे हे लेखनकौशल्य आहे. कथालेखनाचे कौशल्य विकसित व्हावे हा या घटकाच्या अभ्यासामागचा हेतू आहे.


उपयोजित लेखनप्रकारामध्ये 'कथालेखन' हा घटक विदयार्थ्यांच्या सृजनशील 
लेखनाला वाव देणारा आहे.कल्पना,नवनिर्मिती,स्वभाषेत प्रकटीकरण हे 
या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी 
कथालेखक घडू शकतील. 
कथाबीजानुसार कथाचे विविध प्रकार पडतात.
उदा.
(१) शौर्यकथा
(२) विज्ञान कथा
(३) बोधकथा
(४) ऐतिहासिक कथा
(५) रूपककथा
(६) विनोदीकथा इत्यादी.

खालील मुद्द्यांच्याआधारे कथालेखन करावे.

शीर्षक
कथालेखन 
पात्रांचे स्वभाव विशेष
कथाबीज
पात्रांमधील संवाद
कथेची सुरुवात विषयाला अनुसरून भाषा
कथेतील घटना व स्थळ कथेचा शेवट
कथेतील पात्रे
तात्पर्य(कथेतून मिळालेला बोध, संदेश, मूल्य)

खालील मुद्द्याचा सविस्तर विचार करूया.

(१) कथाबीज  : 
कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथालेखन करताना कथाबीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथाबीज फुलवावे.
(२) कथेची रचना :
लांबन कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. कथेची सुरुवात आकर्षक असावी. वाक्यांची रचना पाल्हाळिक नसावी. आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्ये असावी. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते. कथा नेहमी भूतकाळातच लिहावी.
(३) कथेतील घटना व पात्रे :
कथाबीजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. जे कथाबीजाला पुढे नेऊ शकतील. घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे, पात्र, घटना व स्थळाच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. वर्णन चित्रदर्शी असावे.
(४) पात्रांचे स्वभाव विशेष :
कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषांचे व त्या अनुषंगिक वर्तनांचे वर्णन करावे.
उदा., राग आला तर त्याने हाताच्या मुठी करकचून आवळल्या इत्यादी. 
(५) कथेतील संवाद व भाषा : 
कथेत निवडलेल्या परिसराला कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी. आलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता वाढवता येते. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. संवादाची परिणामकारकता बिरामचिन्हांमुळे निर्माण होते. पात्रांच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करावा.
(६) शीर्षक तात्पर्य :
संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य / संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. कथेतून मिळणारा संदेश / मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंधित करणारे तात्पर्य असावे.
कथालेखन पूर्णतः सृजनशील कल्पकतेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी, अपूर्ण कथा
पूर्ण करण्यासाठी वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित आहे. 
विद्यार्थ्यांनो, तुमच्या सृजनशील कल्पनेला खूप घुमारे असतात. त्यांना फक्त निरीक्षण व 
कल्पकतेने अभिव्यक्त करा.

कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती
(१) कथाबीजावरून कथालेखन
(२) दिलेल्या शीर्षकावरून कथालेखन
(३) मुद्द्यांवरून कथालेखन
(४) दिलेल्या शब्दांवरून कथालेखन

(५) कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे.


कथालेखन करताना घ्यावयाची काळजी
कथेसाठी दिलेला विषय समजावून घ्यावा.
कथेसाठी दिलेले शब्द, मुद्दे, विषय, पूर्वार्ध, उत्तरार्ध काळजीपूर्वक वाचा व अर्थ समजावून घ्यावा.
कथालेखन करताना आकर्षक सुरूवात, माहीती पूर्ण मध्य, सकारात्मक शेवट असा क्रम असावा.
कथालेखन करताना भाषा, घटना, कालानुक्रम, पात्र, संवाद, प्रसंग यांमध्ये सुसूत्रता असावी.
कथेची उत्सुकता शेवटपर्यंत टिकावी. ओघवती लेखन शैली असावी.
कथेची भाषा साधी व सुटसुटीत असावी.
कथा भूतकाळात लिहावी.

● कथेला शीर्षक द्यावा. (तात्पर्य लिहीण्याची आवश्यकता नाही )


खालील शब्दांच्या आधारे कथा तयार करा.
धैर्य — धाडस — स्वाभिमान — देशभक्ती
• मृणाली — गावातील स्त्रीया — नदी — पूर — उडी —  प्राण वाचवणे — कौतुक
• राजा — लाडका हत्ती — म्हतारा —  चिखल — बाहेर
• कोंबडी — सोन्याचे अंडे — पैसा — लोभ — अधिक अंडे मिळवणे — मृत्यू
• टोपी विकणे — जंगलप्रवास — दूपार — माकडे — टोप्या फेकणे — आनंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here