मराठी उपयोजित लेखन जाहिरात लेखन
आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये जाहिरातीला अत्यंत मह्त्व आहे. जाहिरात म्हणजे एखादया उत्पादनाकडे वाचकांचे लक्ष वेधून घेणे होय. जाहिरात ही एक सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे एक कौशल्य आहे. जाहिरातीचा मुख्य उद्देश लोकांच्या मनात एखादया उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा असतो. जाहिरातीने उत्पादनाची विक्री वाढते, हेच उत्तम जाहिरातीचे गमक आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी (मोबाइल) यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्र अधिक व्यापक झाले आहे. |
jahirat lekhan in marathi
जाहिरात म्हणजे काय ?
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वस्तूंबाबत आपल्याला काही माहिती असणे आवश्यक आहे.
(१) आपल्याला हवी असलेली वस्तु कोण निर्माण करते ?
(२) ती वस्तू आपल्या गरजा किती प्रमाणात भागवते ?
(३) ती वस्तु कुठे मिळते?
(४) त्या वस्तूची किंमत काय ?
वरील माहिती पुरवणाऱ्या मजकुराला ‘जाहिरात’ म्हणतात. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती आपल्याला जाहिरातींमार्फत मिळते. म्हणजेच, जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपर्यंत नेण्याचे काम करते.
वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडण्याचे कार्य जाहिरात करते. आपण निर्माण केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणून जाहिरात आकर्षक असावी लागते.तसेच, एकाच प्रकारची वस्तू निर्माण करणारे अनेक निर्माते असतात. अशा वेळी आपलीच वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणूनही जाहिरात आकर्षक करावी लागते. |
jahirat lekhan in marathi
how to write jahirat lekhan in marathi
जाहिरात लेखन कसे करावे ?
(१) जाहिरात तयार करताना मथळा, उपमथळा तयार करावा. त्यासाठी सुभाषिते सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या वा गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी. लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करावा.
(२) जाहिरातीचा सुरुवातीला लक्ष वेधून घेणारे शब्द वापरावेत जसे खुशखबर, धमाकेदार सेल, एकावर एक फ्री, आधी या आधी मिळवा, 70% सूट अशाप्रकारे
(३) जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षक रीतीने मांडलेले असावे.
(४) आलंकारिक, काव्यमय प्रभावी शब्दरचनेचा वापर करावा. जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
(५) ग्राहकांची सातत्याने बदलणारी आवड, सवयी, फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसायला हवे. तसेच,
(६) जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी.
(७) जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते, हे खरे. मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे अनिवार्य नाही.
(८) जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळींत केलेली मांडणीही पुरेशी.
(९) जाहिरातीत संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक (मोबाइल नंबर, इ-मेल आयडी) यांचा स्पष्ट उल्लेख करावा.
jahirat lekhan in marathi
जाहिरातलेखन jahirat lekhan in marathi
मराठी उपयोजित लेखन_ बातमी लेखन
मराठी उपयोजित लेखन_ जाहिरात लेखन
जाहिरात लेखन आराखडा :
आपल्याला दिलेल्या विषयानुसार किंवा शब्दानुसार वरीलप्रमाणे आराखड्यात आपल्या कल्पकतेनुसार जाहिरात लेखन करणे अपेक्षित आहे. वरील आराखडा एक मार्गदर्शक आहे.
जाहिरात लेखन यासाठी परीक्षेमध्ये गुणदान पुढील प्रमाणे केले जाते…..
जाहिरात लेखनासाठी विचारल्या जाणाऱ्या मूल्यमापन कृती :
शब्दांवरून जाहिरात लेखन.
जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.
विषय देऊन जाहिरात लेखन.
दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे.
jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi 10th class
marathi language jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi on umbrella
जाहिरातलेखन jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi 9th class
how to write jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi for 9th class
नमुना कृती : ०१
विषय देऊन जाहिरात लेखन करणे ..
विषय :
तुमची ताई भाजीपोळी छान बनवते. अनेकांनी तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिला आहे.तिनेसुद्धा आता भाजीपोळी केंद्र चालवण्याचा निर्धार केला आहे.तिच्या या भाजीपोळी केंद्राची जाहिरात करा.
उत्तर :
नमुना कृती : ०२
उत्तर:
नमुना कृती : ०३
अभिनय कार्यशाळेची जाहिरात तयार करा…
नमुना कृती : ०४
योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा… (Mar-22)
मराठी उपयोजित लेखन जाहिरात लेखन,मराठी उपयोजित लेखन,उपयोजित लेखन in Marathi,मराठी जाहिरात लेखन,मराठी जाहिरात लेखन नमुना,उपयोजित लेखन मराठी,marathi जाहिरात लेखन,उपयोजित लेखन मराठी 8वी,उपयोजित लेखन हिंदी 8वी,उपयोजित लेखन मराठी 9वी, उपयोजित लेखन मराठी 10वी
कवितेचे रसग्रहण करताना एक अभ्यास
मराठी साहित्यातील रस आणि त्याचे प्रकार
मराठी भाषेतील वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
मराठी व्याकरण : नाम व नामाचे प्रकार
प्रगती पत्रकावर करावयाच्या वर्णनात्मक नोंदी
इयत्ता नववी प्रथम सत्र कवितेचे मुद्द्यांवरून रसग्रहण