Home १० वी बालभारती गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी | Goshta Arunimachi class 10th.

गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी | Goshta Arunimachi class 10th.

15
0

इयत्ता दहावी | कुमारभारती | गोष्ट अरुणिमाची | Goshta Arunimachi class 10th.

                                                                                          सुप्रिया खोत (१९८०)
 सुप्रिया खोत या मराठी भाषेतील वृत्तपत्रे व मासिके यांद्वारे लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी ‘छात्र प्रबोधन’, पुणे येथे काही काळ साहाय्यक संपादिका म्हणून काम केले आहे.
लेखिकेचे साहित्यलेखन:
महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषिवल यांतून त्यांची सदरे प्रसिद्ध झाली आहेत.
पाठाची पार्श्वभूमी :
प्रस्तुत पाठ हा ‘छात्र प्रबोधन, मार्च २०१६’ या मासिकातील असून जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद या साऱ्या गुणांचा आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्त्व ‘अरुणिमा’ हिचा – जीवनप्रवास या पाठातून रेखाटला आहे. अपंगत्वाने खडतर बनलेल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा तिने हार न मानता कसा गाठला, आपला आदर्श जगासमोर कसा ठेवला, तिथपर्यंतचा तिचा प्रवास’ या साऱ्याचे वर्णन सुप्रिया खोत यांनी सविस्तरपणे केले आहे. स्पष्ट ध्येयाला आत्मविश्वास, जिद्द, प्रयत्नांची जोड दिल्यास यशप्राप्ती निश्चित असते या गोष्टीची जाणीव प्रस्तुत पाठ आपणास करून देतो.
पाठातील महत्त्वाचे मुद्दे
एव्हरेस्ट विजेती अरुणिमा सिन्हा
• अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला. अरुणिमा स्वतःच स्वतःची कहाणी सांगत आहे.
• लहानपणीच वडील वारले. मोठ्या बहिणीचे पती हेच त्यांच्या कुटुंबाचे मार्गदर्शक व पालक बनले.
• अरुणिमा स्वतःच कष्टपूर्वक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल याखेळांमधील राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन बनली.
अरुणिमावर जीवघेणा हल्ला
• CISF मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायला ती दिल्लीला चालली होती. रेल्वेगाडीत चोर शिरले. तिच्या गळ्यातल्या सोनसाखळीसाठी त्यांनी तिला बेदम मारहाण केली. तिला रेल्वे रुळांवर फेकून दिले. तिच्या एका पायाचा गुडघ्यापासून खाली चक्काचूर झाला. दुसऱ्या पायाचीही दुरवस्था झाली.
• तिला रात्रभर रेल्वे रुळांवर तळमळत पडून राहावे लागले. सकाळी आलेल्या सफाई कामगारांनी तिला रुग्णालयात नेले. तिचा एक पाय गुडघ्यापासून कापून टाकण्यात आला. दुसऱ्या पायात सळई घालण्यात आली.
• राष्ट्रीय चॅम्पियनवर आलेल्या संकटाचा मोठा गवगवा झाला.सरकारकडून उपचार केले गेले. 
दुर्देवी प्रसंगानंतर दुःखद अनुभव
• प्रसारमाध्यमांमध्ये मात्र अरुणिमाची बदनामी करणाऱ्या अफवा पसरल्या. तिने तिकीट काढले नव्हते इथपासून ते तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत अफवा पसरल्या. तिच्या मनावर याचे खोलवर परिणाम झाले.
अरुणिमाचा निर्धार
अपंगत्वामुळे कर्तृत्वहीन जीवन जगावे लागेल, हे अरुणिमाला सहन होणे शक्यच नव्हते. म्हणून रुग्णशय्येवर असतानाच तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला.
अरुणिमाचे प्रयत्न
हॉस्पिटलमधून घरी रवानगी झाल्यावर दोनच दिवसांत ती उठून उभी राहिली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला बचेंद्री पाल यांना ती भेटली. त्यांनी तिला भरघोस प्रोत्साहन दिले.
अरुणिमाची एव्हरेस्ट चढाई
• अरुणिमा ‘नेहरू गिरिभ्रमण केंद्रात दाखल झाली. प्रशिक्षण खूपच खडतर होते. अनेकदा मरणप्राय यातना देणाऱ्या घटना घडल्या. बावन्न दिवसांची ती रोमांचकारक लढाई होती.
• चौथ्या बेस कॅम्पपासून एव्हरेस्ट शिखर ३५०० फुटांवर आहे. हा शेवटचा टप्पा. या टप्प्यातच जास्तीत जास्त गिर्यारोहकांचे मृत्यू घडतात. अरुणिमाने प्रचंड धैर्याने हा टप्पा पार केला. तिच्याकडील प्राणवायूचा साठा संपत आला होता. ही मृत्युघंटाच होती. पण आता माघार घेतली तर आयुष्यभरात कधीच ही संधी मिळणार नाही, अशी तिला खात्री होती. ती पराकोटीच्या निर्धाराने एव्हरेस्टवर पोहोचली. भारताचा झेंडा फडकवला.
• परतताना प्राणवायू संपला. ब्रिटिश गिर्यारोहकाने फेकून दिलेला सिलिंडर तिला मिळाला. त्यामुळे ती जिवंतपणे परतू शकली.
• गिर्यारोहणाने तिला आत्मविश्वास दिला. पोलादी कणखरपणा दिला.
राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी स्वतः सांगितलेला अनुभव, प्रवास व्हिडीओ पहा.


स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मराठी
कुमारभारती
इयत्ता : दहावी
आश्वासक चित्र  -नीरजा 
बोलतो मराठी...  – डॉ.नीलिमा गुंडी 
आजी : कुटुंबाचं आगळ  -प्रा.महेंद्र कदम 
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास 
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता )  - द.भा.धामणस्कर 
गवताचे पाते   - वि.स.खांडेकर
वाट पाहताना   - अरुणा ढेरे 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here