Home १० वी बालभारती गवताचे पाते Gavtache Pate

[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] गवताचे पाते Gavtache Pate

25
0

[ मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी ] गवताचे पाते Gavtache Pate

                                                                      वि. स. खांडेकर (१८९८ ते १९७६ ) :

    कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथालेखक. १९७४ साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या  वाङ्मयसेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे ‘कांचनमृग’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का, ‘दोन मने’, ‘हिरवा चाफा’, ‘रिकामा देव्हारा’, ‘पांढरे ढग’, ‘पहिले प्रेम’, ‘जळलेला मोहोर’, ‘ययाति’, ‘अमृतवेल’ आणि ‘अश्रु’ या कादंबऱ्या; ‘वायुलहरी’, ‘चांदण्यात सायंकाळ’, ‘अिवनाश’, ‘मंदाकिनी’ इत्यादी लघुनिबंधसंग्रह; ‘वनभोजन’, ‘धुंधुर्मास’, ‘फुले आणि काटे’, ‘गोकर्णीची फुले’, ‘गोफ आणि गोफण’ हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी  लेखन प्रकाशित आहे. 
       रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्येयांची मांडणी  खांडेकरांनी रूपक कथांतून केली. ‘सुवर्णकण’, ‘क्षितिजस्पर्श’, ‘वेचलेली फुले’ हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यांपैकी ‘सुवर्णकण’  हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे  पाते या घटकांच्या रूपकांतून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे.

बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यांपैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही  वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थक्षणोक्षणी अंशत: कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच.

वाचा: Latest Marathi News

[ मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी ] गवताचे पाते Gavtache Pate


रूपक कथेचा भावार्थ –

  अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची  चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे; पण झाडावरून गळून  पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते.
     मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून  घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय?               
    …आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते?  तीही जुना कित्ताच गिरवत बसते! बाह्य स्वरूप कितीही बदलले, तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत  असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. 
     दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून त्याचे सुखदु:ख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची  प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर यादोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल  होईल का?

 : पाठ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा :


 आपल्या मित्रांना शेअर करा. whatsapp.jpg

 

 

 

गवताचे पाते -१
गवताचे पाते -१

मराठी
कुमारभारती
इयत्ता : दहावी

 

बोलतो मराठी...  – डॉ.नीलिमा गुंडी 
आजी : कुटुंबाचं आगळ  -प्रा.महेंद्र कदम 
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास 
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता )  - द.भा.धामणस्कर 
गवताचे पाते   - वि.स.खांडेकर
वाट पाहताना   - अरुणा ढेरे 

( २ ) कारणे लिहा :

(अ) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ______
 उत्तर :
झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता. 

(आ) ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ______
उत्तर :
‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,’ असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी ‘आ’ सुद्धा केला नव्हता.

(इ) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण ______
उत्तर :
वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले; कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.


( ३ ) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. 

( अ ) बेजबाबदारपणा –
जर, जप, दाब, दार, दाणा, बाब, बाप, बाणा, बेजबाब, जबाब, बेजबाबदार

( आ ) धरणीमाता  –
धर, धरणी, रणी, तार, रमा, मार, माता

( इ  ) बालपण   –
बाल, बाप, बाण, लप, पण


( ५ ) खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?

(अ) ज्ञानी × सुज्ञ 
(आ) निरर्थक × अर्थपूर्ण 
(इ) ऐच्छिक × अनिवार्य 
(ई) दुर्बोध × सुबोध
उत्तर :
       ज्ञानी × सुज्ञ


( ६ ) स्वमत :

(अ) माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर :
माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत… वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.

(आ) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?

उत्तर :
मी गवतपाते असतो,तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते :
“आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वत:चेच बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते.

आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हांला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हांला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो. म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हांला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही.

आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला. स्वत:च्या प्रकृतीला जपा.

(इ) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.

उत्तर :
हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.

पट… पट… पट…

त्यांचा तो पट… पट… पट… असा कर्णकटू आवाज

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, “अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं तर नाही ना?” 

पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, “काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे?”

“छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?”

“काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार?”

“असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!”

हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.

ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती… पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!

ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!

[ मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी ] गवताचे पाते Gavtache Pate


letter writing in marathi पत्रलेखन उपयोजित लेखन मराठी |इयत्ता दहावी
batmi lekhan in marathi बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी 
Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन - सारांश लेखन मराठी
जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी marathi jahirat lekhan

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
whatsapp group-1

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️


aabhar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here