Home इतर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन | Dr Sarvepalli Radhakrishnan

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन | Dr Sarvepalli Radhakrishnan

86
0

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय (Dr.sarvepalli radhakrishnan biodata)


संपूर्ण नाव      :   डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
धर्म             :    हिंदु
जन्म            :    ५ सप्टेंबर १८८८
जन्म स्थान    :    तिरुत्तनी गाव, मद्रास
आई व वडील   :     सीतम्मा, सर्वपल्ली विरस्वामी


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

हे भारतीय तत्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन, चरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. पण सर्वेपल्ली राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून वेगळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्वज्ञान प्रसिद्ध होती. स्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ हा पुरस्कार ठेवला आहे. राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?’ कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिनम्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षकहा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस….

डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.  डॉ. राधाकृष्णन्‌ यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रासजवळील तिरुत्तनी येथे झाला.  वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. ‘तत्त्वज्ञान’ हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी ‘वेदांतातील नीतिशास्त्र’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची सार्‍या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे पार परदेशा‍त त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते ‘नीतिशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here