एकदा एका राजाने खूश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किमतीचे नॉलेज नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.
एक दिवस असेच राजा त्याच्या घराजवळून जात होता. राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल. परंतु, प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे, असे दिसले. राजाला आश्चर्य वाटले.
सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले. तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले. लोहार खूप रडू लागला, त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली, तेव्हा राजा म्हटला अशी भेट वारंवार भेटत नाही. मित्रांनो, आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्त्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण…
त्यावेळेस आपण म्हणतो, ‘देवा मला अजून थोडा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.’मानवी जीवन अनमोल आहे. असे जीवन परत मिळणार नाही.
तात्पर्य : या जगात एक नंबरची दुर्लभ गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मनुष्य देह. त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे
bodhkatha-manushya-deha-durlabha