बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी batmi lekhan in marathi 10th
उपयोजित लेखन : बातमी लेखन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा इयत्ता दहावी कुमारभारती कृतिपत्रिकेत उपयोजित लेखन प्रकारात बातमी लेखन विचारले जाते.
S – (South)
बातमी ही आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण जगामध्ये कोठे काय घडले ? हे आपल्याला बातमी द्वारे कळते. म्हणूनच वस्तूस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे, बातमी लेखन करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची असते.बातमी मध्ये आपल्याला काय घडले? कधी घडले? कुठे घडले कोण कोण उपस्थित होते? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी. बातमी लेखना मध्ये जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. शालेय स्तरावर साजरे झालेले कार्यक्रम, राबविलेले उपक्रम, उदा. विविध दिन, ( मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन…) स्नेहसंमेलन, वृक्षारोपण, सहल, विविध स्पर्धा वगैरे इ. माहिती देऊन बातमीलेखन विचारले जाते. |
बातमी लेखन गुणविभागणी (२०१९-२० आराखड्यानुसार नुसार )
भाषा शैली | ०१ |
तटस्थ भूमिकेतून लेखन | ०१ |
घटनेचा अचूक व योग्य तपशील | ०२ |
बातमीचे शीर्षक | ०१ |
एकूण गुण | ०५ |
वरील सर्व मुद्यांचा विचार करून एकत्रित गुणदान केले जाते. सूचनेनूसार कृती सोडविणे अपेक्षित. |
वृत्तलेखनाचे स्वरूप
शीर्षक :
बातमीला योग्य समर्पक शीर्षक द्यावा. संपूर्ण बातमीचा अर्क बातमीच्या शीर्षकात असतो. शीर्षक आकर्षक असावे ते वाचताक्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख झाली पाहिजे. बातमीविषयी वाचकाच्या मनात कुतूहल व बातमी वाचण्याची उत्कंठा वाचकांच्या मनात झाली पाहिजे.
वृत्ताचा स्त्रोत :
शीर्षकानंतरच्या ओळीत हा वृत्ताचा स्त्रोत दिलेला असावा. बातमी कोणी दिली या भागात सांगितले जाते.
उदा. ‘आमच्या वार्ताहरांकडून’ , ‘आमच्या प्रतिनिधींकडून ‘, ‘एक्सप्रेस वृत्तसंस्थेकडून‘
स्थळ व दिनांक :
बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी घडली हे यात सांगितलेले असते. बातमीच्या सुरू वातीलाच हा तपशील येतो.तद्नंतर लागलीच बातमीला सुरू वात करावी.
उदा. राजूर, दि. २२ जून. , मुंबई, दि. २२ जून. , पुणे, दि.२२ जून.
जालना, दि. २२ जून.
वृत्ताचा शिरोभाग :
बातमीचा पहिला परिच्छेंद म्हणजे बातमीचा शिरोभाग होय. बातमीचा अत्यंत महत्वाचा भाग या शिरोभागात लिहिलेला असावा.म्हणजे वाचकाची बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते.
सविस्तर वृत्त :
शिरोभागानेतरच्या परिच्छेदात वृत्त सविस्तर द्यावे. बातमीचा मागचा पुढचा संदर्भ या भागात स्पष्ट करावा. बातमीला पूर्णत्व द्यावे.
- घटनेचा अचूक योग्य तपशील द्यावा.
- प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचेच लेखन करावे. स्वतःच्या मनाचे अवास्तव लेखन नसावे.
- बातमी घडून गेलेल्या घटनांवर आधारित असल्याने बातमीचे भूतकाळांत लेखन करावे.
- बातमी लेखन करताना तटस्थ भूमिका असावी. स्वतःची मते व्यक्त करू नये. थोडक्यात, बातमी ही वस्तुस्थितीदर्शक असावी.
- एखादया समारंभाची बातमी असल्यास आयोजन कोणी केले, अध्यक्ष कोण होते, पाहुणे कोण आले होते यांचा उल्लेख असावा.
- बातमी लेखनात कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी.
अधिक माहितीसाठी खालील Video पहा
नमुना कृती : ‘ सर्वोदय विद्यालय, नाशिक’ या विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा. |
नमुना कृती : खालील विषयावर बातमी तयार करा. (Mar-20) नवमहाराष्ट्र विद्यालय, शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा. |
अधिक माहितीसाठी खालील ppt पहा
[pdf-embedder url=”https://www.marathistudy.com/wp-content/uploads/2021/11/Rutant-Lekhan.pdf” title=”Rutant Lekhan”]
letter writing in marathi पत्रलेखन | उपयोजित लेखन | मराठी |इयत्ता दहावी
batmi lekhan in marathi बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी
Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन - सारांश लेखन | मराठी
जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी marathi jahirat lekhan
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Nice Website
Nice website
🎀कै. भाऊसाहेब के. आर. पाटील हायस्कूल बुरझड 🎀
📃संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला 📃
👉शिक्षक व विद्यार्थींनी खुप मेहनत घेतली 👈
* डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर भाषण स्पर्धा *
* रांगोळी स्पर्धा *
* चित्रकला स्पर्धा *
🌺 असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 🌺
🌹कार्यक्रमाचे अध्यक्ष- मुख्याध्यापक श्री. बी. आर.बोरसे सर🌹
बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी batmi lekhan in marathi 10th – http://www.marathistudy.com
Marathi study nice