Home लेखन कौशल्य Batmi lekhan in Marathi मराठी बातमी लेखन

Batmi lekhan in Marathi मराठी बातमी लेखन

1472
2
Batmi lekhan in Marathi
Batmi lekhan in Marathi

Batmi lekhan in Marathi एस.एस. बोर्ड परीक्षेत वारंवार बातमी लेखन मराठी यावर आधारित कृती विचारली जाते. आज आपण बातमी लेखन हे माहितीपर, सोप्या आणि नेमक्या शैलीत लिहिले जाणारे लेखन असते. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मध्ये वारंवार बातमी लेखन मराठी  हा प्रश्न विचारला जातो. बातमी लेखन करताना घटना, ठिकाण, वेळ, कसे घडले हे नेमकेपणाने सांगणे महत्त्वाचे असते.

बातमी लेखन बातमी हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे आणि म्हणून वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे हे एक कौशल्य आहे.

बातमी बातमी घडून गेलेल्या घटनांची व घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते. ज्यात काय घडले? कोठे घडले? कधी घडले? कसे घडले? कोण कोण उपस्थित होते? या प्रश्नांची उत्तरे मिळावयास हवी. बातमीमध्ये जे घडले तसे यथातथ्य वर्णन असायला हवे.

एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत बातमी लेखनाचे महत्त्व

एस.एस.सी. परीक्षेतील बातमी लेखन  हे पाच गुणांसाठी विचारले जात असते. विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावरून  माहितीपूर्ण बातमी तयार करायची असते. विद्यार्थ्यांनी बातमीचे शीर्षक, घटनास्थळ, दिनांक, वृत्ताचा शिरोभाग आणि सविस्तर वृत्त यांचा समावेश करून व्यवस्थित बातमी लेखन करणे आवश्यक आहे.

मराठी उपयोजित लेखन_ बातमी लेखन

मराठी उपयोजित लेखन_ जाहिरात लेखन

 बातमी लेखनाचे स्वरूप

  • शीर्षक :
    बातमीला योग्य समर्पक शीर्षक द्यावा. संपूर्ण बातमीचा अर्क बातमीच्या शीर्षकात असतो. शीर्षक आकर्षक असावे ते वाचताक्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख झाली पाहिजे. बातमीविषयी वाचकाच्या मनात कुतूहल व बातमी वाचण्याची उत्कंठा वाचकांच्या मनात झाली पाहिजे.
    उदा. : सर्वोदय विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा
  • वृत्ताचा स्त्रोत :
    शीर्षकानंतरच्या ओळीत हा वृत्ताचा स्त्रोत दिलेला असावा. बातमी कोणी दिली या भागात सांगितले जाते.

    उदा. ‘आमच्या वार्ताहरांकडून’, ‘आमच्या प्रतिनिधींकडून’, ‘एक्सप्रेस वृत्तसंस्थेकडून’
  • स्थळ व दिनांक :
    बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी घडली हे यात सांगितलेले असते. बातमीच्या सुरुवातीलाच हा तपशील येतो. तद्नंतर लागलीच बातमीला सुरूवात करावी.
     उदा. राजूर, दि. २२ जून, मुंबई, दि. २२ जून, पुणे, दि. २२ जून, जालना, दि. २२ जून.
  • वृत्ताचा शिरोभाग :
     बातमीचा पहिला परिच्छेद म्हणजे बातमीचा शिरोभाग होय. बातमीचा अत्यंत महत्वाचा भाग या शिरोभागात लिहिलेला असावा. म्हणजे वाचकाची बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते.
  • सविस्तर वृत्त :
     शिरोभागानंतरच्या परिच्छेदात वृत्त सविस्तर द्यावे. बातमीचा मागचा पुढचा संदर्भ या भागात स्पष्ट करावा.
  • वृत्ताचा शेवट :
    बातमीचा शेवट करताना उपस्थित लोक,कार्यक्रमाचे आयोजक-नियोजक यांचा संदर्भ देऊन बातमीला पूर्णत्व द्यावे.

मराठी उपयोजित लेखन_ पत्रलेखन

कवितेचे रसग्रहण करताना एक अभ्यास

बातमी लेखन गुणविभागणी (२०१९-२० आराखड्यानुसार नुसार )

भाषा शैली ०१
तटस्थ भूमिकेतून लेखन ०१
घटनेचा अचूक व योग्य तपशील ०२
बातमीचे शीर्षक ०१
एकूण गुण ०५
वरील सर्व मुद्यांचा विचार करून एकत्रित गुणदान केले जाते. सूचनेनूसार कृती सोडविणे अपेक्षित.

 बातमी लेखनाचा आराखडा 

बातमीलेखन करताना घ्यावयाची काळजी :

  • साधी, स्पष्ट आणि नेमकी भाषा वापरा.
  • विना-अनावश्यक माहिती टाळा.
  • प्रमाण मराठी भाषेचा वापर करा.
  • घटनेचा अचूक योग्य तपशील द्यावा. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचेच लेखन करावे. स्वतःच्या मनाचे अवास्तव लेखन नसावे.
  • बातमी घडून गेलेल्या घटनांवर आधारित असल्याने बातमीचे भूतकाळात लेखन करावे.
  • वाचकाच्या मनात प्रश्न राहू नयेत असे बातमीचे रचनाक्रम ठेवा.
  • बातमी लेखन करताना तटस्थ भूमिका असावी. स्वतःची मते व्यक्त करू नये. थोडक्यात, बातमी ही वस्तुस्थितीदर्शक असावी.
  • एखादया समारंभाची बातमी असल्यास आयोजन कोणी केले, अध्यक्ष कोण होते, पाहुणे कोण आले होते यांचा उल्लेख असावा.
  • बातमी लेखनात कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी.

बातमी लेखनासाठी कृती :

  • दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे.
  • दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे.
  • शालेय स्तरावर साजरे झालेले कार्यक्रम / उपक्रम यावर बातमी तयार करणे. उदा. विविध दिन, (मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन…) स्नेहसंमेलन, वृक्षारोपण, सहल, विविध स्पर्धा वगैरे…. इ. माहिती देऊन बातमीलेखन विचारले जाते. 

या लेखाच्या मदतीने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून बातमी लेखनाच्या कौशल्यावर अधिक पकड मिळवता येईल.

बातमी लेखन नमुना कृती :

नमुना कृती 01 : खालील विषयावर बातमी तयार करा. ‘सर्वोदय विद्या मंदिर, राजूर’ या विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न झाला.

उत्तर :

मराठी साहित्यातील रस आणि त्याचे प्रकार

मराठी भाषेतील वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग

नमुना कृती 02 :  खालील विषयावर बातमी तयार करा. (Mar – 2020)
नवमहाराष्ट्र विद्यालय, शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा.

उत्तर :

मराठी व्याकरण : नाम व नामाचे प्रकार

प्रगती पत्रकावर करावयाच्या वर्णनात्मक नोंदी

इयत्ता नववी प्रथम सत्र कवितेचे मुद्द्यांवरून रसग्रहण

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here