Home १० वी बालभारती जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security...

जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security Subject | Class X

33
0
Assessment of Water Security Subject, Class X, Evaluation of Water Security, Evaluation of water security issues, इयत्ता दहावी, जलसुरक्षा, जलसुरक्षा प्रकल्प मराठी, जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन, इयत्ता दहावी जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन,

जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security Subject |Evaluation of Water Security| Class X

जलसुरक्षा हा विषय इयत्ता १० वी साठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारित करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे.
इयत्ता 10 वी जलसुरक्षा (अनिवार्य) विषयाच्या मूल्यमापन योजनेबाबत….
  इयत्ता दहावीसाठी सन 2021-22 या सालापासून ‘जलसुरक्षा’ हा ‘अनिवार्य श्रेणी विषय’ करण्यात आलेला आहे. सदरच्या विषयासाठी पाठयपुस्तक आणि कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशी दोन पुस्तके तयार केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) निर्धारित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वापर करावयाचा आहे. या पाठयपुस्तकात जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश आहे. या घटकावर आधारित विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प पूर्ण करावयाचे आहेत. कार्यपुस्तिकेमध्ये प्रकल्प आणि उपक्रम यांच्या नोंदी करावयाच्या आहेत.
 विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकावर तीन उपक्रम आणि एक प्रकल्प असे एकूण 12 उपक्रम आणि 4 प्रकल्प वर्षभरात पूर्ण करावयाचे आहेत. मूल्यमापनासाठी खालील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे, उपक्रम आणि प्रकल्प यांची निवड करून त्यांना गुण दयावयाचे आहेत. हे सर्व मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी तपासले जाणार आहे. तसेच कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही ) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घेतले जाणार आहेत. जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन विषयक नोंदी सत्रनिहाय (प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र ) कराव्यात.

Evaluation of Water Security

 मूल्यमापन योजना 
Assessment of Water Security
 💥 परिपत्रक डाऊनलोड करा. 💥
[wpdm_package id=’1918′]
 💥 नमुना प्रकल्प डाऊनलोड करा. 💥
 💥 जलसुरक्षा विषय मूल्यमापन विद्यार्थी गुणदान तक्ता 💥
आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here