Home इतर इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात आनंददायी शनिवार_Ananaddayhi Shaniwar

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात आनंददायी शनिवार_Ananaddayhi Shaniwar

805
0

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात आनंददायी शनिवार’

शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, चांगल्या सवयी विकसित होऊन ते सुजाण नागरिक व्हावेत, म्हणून ‘आनंददायी शनिवार‘ उपक्रम राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) उपक्रमाची कृतिपुस्तिका प्रसिद्ध केली आहे.

राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हा उपक्रम राबविण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. या अनुषंगाने ‘एससीईआरटी’ने ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमासाठी राज्यातील सर्व शासनमान्य शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक कृतिपुस्तिका तयार केली आहे.

Ananaddayhi Shaniwar


संकल्पना :

१) आनंददायी शनिवार या उपक्रमातून आनंददायी अध्ययनातून विदयार्थी गुणवत्तेमध्ये वाढ होईल. या उपक्रमातून अभ्यासक्रमाशी निगडित खेळ, कला, व्यावसायिक शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण, क्षेत्रभेटी, इत्यादींवर भर देण्यात आलेला आहे.
२) उपक्रमातून अभ्यासक्रमाशी निगडित खेळ, कला, व्यावसायिक शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण, क्षेत्रभेटी, इत्यादींवर भर देण्यात आलेला आहे.
३) ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळेतील प्रत्येक विषयशिक्षकांनी एकत्रित येऊन इयत्ता पहिली ते दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी या शैक्षणिक स्तरानुसार नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. (परिस्थितीनुसार यात लवचिकता असू शकेल.)
४) आनंददायी शनिवार उपक्रमात आनंददायी विविध कृतींचा समावेश आहे. विदयार्थी सर्व कृती आनंदाने करतात. प्रत्यक्ष कृती मधून शिक्षणातील कौशल्य प्राप्ती, अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे.
५) विशेष गरजा असलेल्या मुलाचा समावेश करण्यासाठी त्याला पालक, विशेष शिक्षक, विद्यार्थी यांचे साहाय्य प्रदान केले जाणार आहे.
६) या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील ‘आवश्यक विषय, कौशल्ये आणि क्षमतेचे अभ्यासक्रमिक एकात्मीकरण’ या घटकातील इयत्ता सहावी ते आठवी दरम्यान विद्यार्थ्यांना ‘व्यावसायिक कलांचा’ प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी ‘दहा दिवस दप्तराविना’ या उपक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.
७) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील टास्क क्र. ९२ अंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीसाठी अभ्यासक्रमाशी निगडित आनंददायी कृतींची निर्मिती करण्यास सूचित करण्यात आलेले आहे. याअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करायचे आहे.


आनंददायी उपक्रमाची उ‌द्दिष्टे :

१) विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे.
३) शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.
४) विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
५) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे.
६) विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे.
७) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे.
८) विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे.
९) विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती व नेतृत्व गुण यांचा विकास करणे.
१०) विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगांची माहिती देणे.
११) विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे.
१२) विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे.
१३) कृषीविषयक आवड व आदर निर्माण करणे, कृषीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देणे.
१४) लोकसेवा अधिनियमबाबत जागृती निर्माण करणे.
१५) विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.
१६) कृतिशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे.
१७) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे.
१८) विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे.


आनंददायी शनिवार कार्यपद्धती :

या वर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम २०२४-२५ या वर्षापासून राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमासाठी सर्व विषयशिक्षकांनी एकत्रित कार्य करायचे आहे. आपल्या विषयांतर्गत येणाऱ्या उपक्रमांची निवड या कृतिपुस्तिका संचयिकेतून किंवा खाली निश्चित करण्यात आलेल्या आराखड्याप्रमाणे स्वतः निर्मिती करायची आहे. यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धतीचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे.
१) उपक्रमाचे नाव
२) पूर्वनियोजन
३) विकसित होणारे कौशल्य
४) आवश्यक साधनसामग्री
५) अंमलबजावणी दरम्यानच्या कृती
• शिक्षक कृती
• विद्यार्थी कृती
६) संदर्भ

Ananaddayhi Shaniwar 


आनंददायी शनिवार’ उपक्रमाच्या अपेक्षित उ‌द्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार उपक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक स्तरनिहाय उपक्रमांची मांडणी करण्यात आली आहे. (इयत्ता पहिली व दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी) यासाठीचा स्तर किंवा इयत्तानिहाय शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन वर्गातील किंवा वर्गाबाहेरील कृती कराव्यात, त्यात खालील बाबींचा समावेश करता येईल.
१) क्षेत्रभेट
२) प्रात्यक्षिक/कृतीसह व्याख्याने
३) व्यावसायिक माहिती
४) स्वनिर्मिती
५) सर्वेक्षण
६) कलाकौशल्य
७) क्रीडाकौशल्य
८) मुलाखत
९) बौद्धिक खेळ
१०) गटांमधील नावीन्यपूर्ण कृती

शिक्षकांची सर्जनशीलता व कल्पकतेनुसार या यादीत भर पडू शकते.

‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाची कृतिपुस्तिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here