💥द्विगू समास 💥 |
पुढील वाक्ये वाचा.
(१) रामचंद्र पंचवटीत राहात होते.
(२) नवरात्रात देवीचा उत्सव असतो.. (३) चातुर्मासात स्त्रिया व्रते घेतात. (४) अशी माणसे त्रिभुवनात नसणार. वरील वाक्यांतील ठळक अक्षरात छापलेले सामासिक शब्द पाहा. त्यांचा विग्रह पुढीलप्रमाणे
(१) पंचवटी (पाच वडांचा समूह)
(२) नवरात्र (नऊ रात्रींचा समूह)
(३) चातुर्मास (चार मासांचा समूह) (४) त्रिभुवन (तीन भुवनांचा समूह) या विग्रहावरून तुमच्या लक्षात आले असेल, की या प्रत्येक सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. या पदांचा परस्परसंबंध विशेषण, विशेष्य असाच आहे. म्हणजे हा कर्मधारय समासाचाच प्रकार आहे.
या सामासिक शब्दांतील पहिली पदे संख्याविशेषण आहेत व सामासिक शब्दांवरून एक समूह सुचविला जातो.
अशा प्रकारे ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एक समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास ‘द्विगू समास’ असे म्हणतात.
हा समास नेहमी एकवचनात असतो.
या समासाची आणखी काही उदाहरणे सप्ताह, त्रिदल, पंचपाळे, चौघडी, त्रैलोक्य, बारभाई, पंचारती.
द्विगू समासाला ‘संख्यापूर्वपद कर्मधारय समास’ असेही म्हणतात.
|
💥समास मुख्य पेजवर जा 💥 |