शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
आपण बोलताना अनेक शब्द उच्चारतो, आपण आपले विचार शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करतो. वाक्यात जे शब्द वापरतो ते सर्व शब्द सांगणारा. बोलणारा व ऐकणारा यांना माहित असतात. ते सर्व शब्द मराठी भाषेतील नाहीत. कोणत्याही भाषेत प्रथम शब्द थोडेच असतात, भाषा समृद्ध होण्यासाठी इतर भाषा त्यातील शब्दांचा आपण उपयोग केला. ते शब्द भाषेत रूढ झाले. आपल्या भाषेत आलेले मूळ शब्द कोणते, कुठल्या भाषेतील आहेत, जसेच्या तसे घेतले की कोणत्या शब्दात बदल करून नवीन शब्द तयार झाला. कोणत्या इतर भाषेतून घेतला याचा अभ्यास करणे म्हणजे शब्दसिध्दी Shabdasiddhi होय.
शब्द कसा बनतो.( तयार) म्हणजेच सिध्द होतो. याला शब्दसिद्धी असे म्हणतात. मराठीची जननी मूळभाषा संस्कृत ती मधून काही शब्द जसेच्या तसे घेतले तर काही शब्दात बदल करून स्वीकारले.
तर बदल होऊन आलेल्या शब्दांना आपण साधित शब्द म्हणतो.
शब्दसिद्धी म्हणजे काय ?
भाषेमधला शब्द कसा तयार होतो, त्याला शब्दसिद्धी म्हणतात. (सिद्ध होण तयार होणे.)
• शब्दांचे दोन प्रकार :
(१) सिद्ध शब्द :
मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना आपण सिद्ध शब्द म्हणतो.
• भाषेत शब्द जसा आहे, तसा वापर केलेल्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.
सिद्ध शब्दांचे चार प्रकार आहेत :
(१) तत्सम
(२) तद्भव
(३) देशी
(४) परभाषीय.
तत्सम शब्द :
• संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात.
उदा.
दीप, अग्नी, चक्र, दुग्ध, गृह इत्यादी.
तद्भव शब्द :
• संस्कृत शब्दांपासून मराठीत तयार झालेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात.
उदा.
दीप → दिवा, अग्नी → आग, चक्र → चाक, दुग्ध →दूध, गृह → घर,
पर्ण → पान, ग्राम → गांव, तृष्णा → तहान, पुष्प → फूल, घट → घडा …इत्यादी.
देशी शब्द :
जे मूळ मराठीतील शब्द आहेत, त्यांना देशी शब्द म्हणतात.
उदा.
दगड, डोळा, घोडा, झाड, पोट, लुगडे इत्यादी.
परभाषीय शब्द :
• इतर भाषांतून मराठी भाषेत रूढ झालेल्या शब्दांना परभाषीय शब्द म्हणतात.
उदा.
हिंदी → भाई, बात, दिल, बच्चा इत्यादी.
फारसी → अब्रू, पोशाख, हकिकत, महिना इत्यादी.
अरबी → इनाम, जाहीर, खर्च, अर्ज इत्यादी.
गुजराती → दादर, रिकामटेकडा, दलाल, ढोकळा इत्यादी.
कानडी → खलबत्ता, विळी, अडकित्ता, भांडे इत्यादी.
इंग्रजी → स्टेशन, ऑफिस, बस, पेन इत्यादी.
पोर्तुगीज → पगार, बटाटा, तुरुंग, कोबी इत्यादी.
शब्दांचे दोन प्रकार :
साधित शब्द :
( मुद्दामहून ) तयार केलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात.
‘कर’ या सारख्या सिद्ध शब्दापासून तयार झालेले करू कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार यासारखे शब्द तयार होतात त्यांना साधित शब्द म्हणतात.
इयत्ता 10 वी. मराठी कुमारभारती भाषाभ्यास घटकात उपसर्गघटित शब्द, प्रत्ययघटित शब्द, अभ्यस्त शब्द यांचा विचार करुया ….
उपसर्गघटित शब्द :
मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग ही म्हणतात.
आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात. शब्दाच्या पूर्वी जी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात. (शब्दाच्या मागे / पूर्वी) ही अक्षरे अव्ययरूप असतात. कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो. आ + हार = भोजन, वि + हार = क्रीडा, अवगुण, अभिमान यामध्ये अव व गुण हे दोन शब्द असून अव हा शब्द अगोदर आल्याने गुण या शब्दाचा अर्थ बदलतो. |
प्रत्ययघटित शब्द :
शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लागून काही शब्द तयार होतात. त्यांना प्रत्यय म्हणतात.
नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात. प्रत्यय लागून तयार शब्द प्रत्ययघटित शब्द ( शब्दाच्या पुढे, नंतर ) मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात. marathi vyaakaran, marathi grammar Shabdasiddhi |
अभ्यस्त शब्द :
तोच तोच शब्द परत उच्चारला जातो अशा शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. (त्याच शब्दाची पुनरावृत्ती होणे)एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुध्द शब्द शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे, अशा शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात.उदा. हळूहळू गोडगोड, दारोदार, घरघर लाललाल, शेजारीपाजारी, फडफड, वटवट इmarathi vyaakaran, Marathi grammar |
सिद्ध शब्दाचे प्रकार,सिद्ध शब्द म्हणजे काय,shabd siddhi in hindi,शब्द सिध्दी,Shabdasiddhi,shabd siddhi,shabd siddhi marathi grammar,shabd siddhi marathi vyakarana,shabd siddhi vyakarana,siddhi ka paryayvachi shabd,siddhi samanarthi shabd,siddhi examples,shabd siddhi Marathi,shabdsiddhi in Marathi,