औपचारिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करण्यासाठी निबंध लिहिण्यास सांगितला जातो. शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची लेखनशैली सुधारावी यासाठी त्यांना साचेबद्ध पद्धतीचे निबंध लेखन करायला शिकविले जाते. उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात भाषेचे आकलन आणि प्रभुत्व पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो.निबंधाच्या माध्यमातून एखाद्या विषयावर आपले मत तसेच मनात येणारे विचार नोंदविण्यास सांगितले जाते.जि.प.प्राथ.शाळा विरगाव, ता.अकोले, जि.अहमदनगर. शाळेतील इयता ७ वी. मध्ये शिकणारी विद्यार्थीनी कु.समृद्धी आदमाने हिच्या माझी आई निबंधाचे माजी आरोग्य मंत्री मा.ना. राजेश टोपे व लेखिका श्रद्धा कुंभोजकर यांच्याकडुनही कौतुक झाले. माझी आई निबंधामध्ये आईचे आजारपण, आईची अपेक्षा, आईचे कष्ट व परिस्थिती यावर केलेली हृदयस्पर्शी भावनांची गुंफण…. |
माजी आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे साहेब यांनी निबंध वाचल्यावर दिलेली प्रतिक्रिया |
प्रिय समृद्धी,
‘माझी आई’ या विषयावर तू लिहिलेला निबंध माझ्या वाचनात आला. अत्यंत भावनिक करणारा हा निबंध तू लिहिला आहेस. तुझ्या आईच्या कष्टांची तुला किती सखोल जाणीव आहे हे या निबंधातून प्रतीत होते. सातवीत असूनही तुझी समज अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. तुझ्या आईला शिक्षक व्हायचे होते मात्र काही कारणामुळे ती होऊ शकली नाही, तू कलेक्टर व्हावंस असं तुझ्या आईला वाटतं, तू मेहनत घेऊन तुझ्या आईचे हे स्वप्नं साकार करशील. असा मला विश्वास आहे.
तुमच्या झोपडीला लागलेल्या आगीतून तुझ्या आईने तुला वाचवले.एक प्रकारे तो तुझा नवीन जन्मच आहे. बघ, तुझ्या आईने तुला दोनदा जन्म दिल्यासारखेच हे आहे !
तुझ्या आईची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तू कष्ट घेत राहशील असा मला विश्वास आहे. तू खूप चांगले शिकलीस तर तुझी स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील. चांगले शिक्षण आणि करियरसाठी माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्यासोबत आहेत.
तुला आणि तुझ्या आईला भेटायला मला नक्कीच आवडेल.
|