राज्यातील शिक्षक / मुख्याध्यापक / अध्यापकाचा
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
|
Guidelines for Senior Salary Range and Selection Range Training
online वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबतचे पत्र
|
Fullscreen Button
[pdf-embedder url=”https://www.marathistudy.com/wp-content/uploads/2022/06/Training-Letter.pdf” title=”Training Letter”]
मोबाईलवर प्रशिक्षण कसे सुरु करावे? याबाबतची माहिती सदर pdf मध्ये दिली आहे. क्रमवार आपण आपल्या मोबाईलवर प्रशिक्षणाला सुरुवात कशी करावी सविस्तर येथे पहा.
मोबाईलवर प्रशिक्षण कसे सुरु करावे याबाबतचे मार्गदर्शन |
मोबाईलवर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले Infosys Springboard हे app Download करून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे. आपल्याला प्राप्त होणारा वैयक्तीक Log in ID व Password टाकून आपल्याला प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरूवात करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard
संगणक / लॅपटाॅपवर प्रशिक्षण कसे सुरु करावे ? याबाबतची माहिती सदर pdf मध्ये दिली आहे. क्रमवार आपण आपल्या संगणक / लॅपटाॅपवर प्रशिक्षणाला सुरुवात कशी करावी सविस्तर येथे पहा.
संगणक / लॅपटाॅपवर प्रशिक्षण कसे सुरु करावे याबाबतचे मार्गदर्शन |
*संगणकावर \ लॅपटाॅपवर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी खाली लिंक दिली आहे. आपल्याला प्राप्त होणारा वैयक्तीक Log in ID व Password टाकून आपल्याला प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरूवात करता येईल.
https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login
लॅ
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावी?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – चाचणी कशी सोडवावी?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – स्वाध्याय कसा सोडवावा?
👉वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – अभिप्राय कसा द्यावा?
वरील प्रमाणे संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया समजावून घेण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाचे
· प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली मध्येच उपरोक्त बाबी पूर्ण केल्यावरच डाउनलोड करता येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.
· सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी / इंग्रजी ) असेल तसेच व तेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे
· याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे FIRST NAME या ठिकाणी आपले अचूक पूर्ण नाव मराठी मध्येच नोंदवावे तसेच Last Name मध्ये उपलब्ध असणारा क्रमांक हा प्रशिक्षणार्थ्याचा नोंदणी क्रमांक असणार आहे. सदरच्या नोंदणी क्रमांकामध्ये प्रशिक्षणार्थ्याने कोणताही बदल करू नये याची नोंद घ्यावी.
प्रशिक्षणा बाबत महत्वाच्या सुचना
· सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी
https://youtube.com/playlist list=PLFJ76Y6VBMZq4ZEsHdEKUVBCdczbqZ98h या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)
· तसेच आपणास प्राप्त ई मेल मध्ये देखील सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठीच्या मार्गदर्शनपर व्हिडीओच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
· कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी संबंधित व्हिडीओ, PDF आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर समाज माध्यमांवर ( Whats APP, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, ट्वीटर, वेबसाईट, इत्यादी) प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील याची माहिती सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
· सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सुचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व केवळ https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील.
· सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन / निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही ; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
· प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक ( दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत) सकाळी ११.०० ते ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा ईमेल करू नयेत.
· तसेच प्रशिक्षणाबाबतीतील काही शंका अथवा प्रशिक्षण प्रकार बदल, ईमेल बदल अथवा इतर अनुषंगिक बदल याबाबत आवश्यक तक्रार निवारणासाठी आवश्यक फॉर्म व सूचना https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
· ज्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक यांनी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली नाही त्यांना सदर प्रशिक्षणासाठी नव्याने नावनोंदणीबाबत या कार्यालयामार्फत लवकरच सूचना निर्गमित करण्यात येतील.
दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील
प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक ( दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत) सकाळी ११.०० ते ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे.
Join Zoom Meeting
Passcode: SCERT
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️