उपयोजित लेखन| मराठी कुमारभारती | आत्मकथन | Upyojit lekhan | Marathi Kumarabharati | aatmkathan
उपयोजित लेखन मराठी कुमारभारती आत्मकथन , Upyojit lekhan Marathi Kumarabharati aatmkathn, उपयोजित लेखन मराठी, कुमारभारती आत्मकथन , Upyojit lekhan, Marathi Kumarabharati , aatmkathn, आत्मकथन इन मराठी, आत्मकथन मराठी, aatmkathn in marathi, आत्मकथन निबंध ,आत्मकथन कसें करावे
स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता/कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी, आज आपण आत्मकथन या निबंध लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत.
|
💥आत्मकथन 💥आत्मकथनात्मक निबंधातील आणखी काही
आपला आत्मकथनात्मक निबंध चांगला व्हावा असे वाटत असेल तर निबंधात येणारा तोचतोचपणा टाळला पाहिजे.त्यापेक्षा वेगळेपणा आपल्या आत्मकथनात्मक निबंधात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘मी बोलत आहे अशी सुरुवात करावी.
पहिल्या परिच्छेदात कोण आत्मकथन करीत आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. 💥आत्मकथनेही वस्तूंची, वास्तूंची, प्राण्यांची, पक्ष्यांची, माणसांची असतात. त्यातून त्यांची सुखदुःखे, जीवनाविषयक दृष्टिकोन स्पष्ट व्हावेत. माणसामाणसांतील संबंध, माणसे व वस्तू किंवा वास्तू यांच्यातील संबंध स्पष्ट व्हावेत. मानवेतर सृष्टीतील वस्तू, वास्तू किंवा झाडे माणसांचे जीवन पाहात असतात. माणसांचे चुकते कोठे, हे त्यांना सांगावेसे वाटते. ते सारे अनेकदा माणसांच्या जगातील चांगल्यावाईट गोष्टींचे साक्षीदार असतात. त्यांना माणसांबद्दल, मुलांबद्दल काय वाटते ते आपण आत्मकथनात्मक निबंधातून सांगू शकतो. त्यामुळे आपल्या निबंधात वेगळेपणा येऊ शकतो. |
💥आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे 💥 |
🔴 आपण स्वतः ती वस्तू घटक आहोत अशी कल्पना करावी. आत्मकथनात सजीव व निर्जीव वस्तू स्वतः बोलत आहे, अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असावे.
🔴 मानवाप्रमाणे निर्जीव वस्तूंनाही सुखदुःखे यासारख्या भावना असतात अशी कल्पना करून लेखन करावे. 🔴 ज्या घटकाचे आपण आत्मकथन करणार आहोत त्या घटकाच्या जागी आपण आहोत असे मानून कल्पनेने त्याच्या सुख दुःखाचा अनुभव घेवून त्याचे लेखन करावे.
🔴 ज्या घटकाचे आत्मकथन आपण करणार आहोत त्या घटकाचा जन्म, परिस्थिती, जगताना वाटणारी सुखदुःखे व त्या घटकाची असणारी आजची अपेक्षा या गोष्टींचा उल्लेख करावा.
🔴 एखादे चित्र किंवा एकापेक्षा अधिक घटक एकत्र दिले जातील त्यातील कोणतातरी एक घटक अन्य घटकांशी किंवा त्यापैकी एकाशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल.
🔴 दिलेला घटक विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वातलाच असतो.
|
💥 उदा. ‘फळ्याचे आत्मकथन’…… काही भाग |
💥 अधिकचा सरावासाठी कृती येथे पहा.💥 |
💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.