महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया स्वाध्याय iytta nvvi | maharashtraavrun taak ovaalun kaayaa swaadhyaay
अण्णा भाऊ साठे |
सुप्रसिद्ध लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार व नाटककार महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली व विविध कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची प्रतिमा, ग्रामीण ढंगातील तमाशाला ‘लोकनाट्य’ हे बिरुद त्यांनीच दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे ते लोकशाहीर होते. आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून तत्कालीन सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले. कवीचे साहित्यलेखन
कादंबऱ्या: ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’, ‘रूपा’, ‘गुलाम’, ‘रानगंगा’, ‘चंदन’, ‘मधुरा’, ‘माकडीचा माळ’, ‘ गुरहाळ ‘ ‘वैजयंता आवडी’, ‘पाझर’, ‘वैर’, ‘आग’, ‘अहंकार’, ‘चित्रा’,“आवडी’ इ.
कथासंग्रह : ‘कृष्णाकाठच्या कथा’, “चिरानगरीची भुतं’, ‘निखारा’, ‘पिसाळलेला माणूस’, ‘फरारी’ इ.
नाटके : ‘इनामदार’, ‘पेरयाच लगीन’, ‘सुलतान’ इ. प्रवासवर्णन: ‘माझा रशियाचा प्रवास’
पोवाडे : ‘माझी मैना गावाकड राहयली’, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्क्ड (लावणीचा एक प्रकार), बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा इ.
कवितेचा आशय :
प्रस्तुत कविता ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ‘कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतली असून, यात त्यांनी महाराष्ट्रावरच्या प्रेमाचे ओघवत्या भाषेत प्रेरणादायी असे वर्णन केले आहे.
|
कविता ऐका व तालासुरात म्हणा…. |
कवितेचा भावार्थ |
कंबर बांधून ………….. टाक ओवाळून काया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रावरील आपले प्रेम व्यक्त करताना म्हणतात, ‘कंबर कसून घाव झेलायला तयार रहा. लढवय्या महाराष्ट्रावरून तू तुझा जीव ओवाळून टाक. |
महाराष्ट्र मंदिरापुढती ।…………टाक ओवाळून काया।
महाराष्ट्रातील मंदिरांतून वीरांच्या यशाच्या ज्योती तेवत आहेत. निसर्गसंपन्न अशा या माझ्या महाराष्ट्राची भूमी सोन्यासारखी समृद्ध व तिच्या माथ्यावर निळे आकाश व्यापून राहिले आहे.
महाराष्ट्राला गड-दुर्गाची, रथी-महारथींची वीर परंपरा शोभून दिसत आहे. ज्या भूमीच्या पायाशी अथांग अरबी सागर आहे, अशा भूमीवरून तू तुझा जीव ओवाळून टाक.
|
ही मायभूमि थोरांची …. टाक ओवाळून काया ।
ही मायभूमी धीरोदात्त अशा शासनकर्त्यांची आहे, तशीच ती शेतकरी व कष्टकरी यांच्या घामाने व श्रमाने पावन झालेली आहे. ही मायभूमी संत आणि शाहिरांची आहे तशीच ती, राष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या तलवारींचीही म्हणजेच वीरांची आहे.
या मातीत जन्मलेल्या धुरंधर शिवरायांना स्मरून या महाराष्ट्रावरून तू जीव ओवाळून टाक.
|
पहा पर्व पातले आजचे ………… टाक ओवाळून काया ।
संयुक्त महाराष्ट्राच्या पर्वाचे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे. यासाठी निश्चय करून, प्रयत्नांचे व परिश्रमाचे पहाड रचून या महाराष्ट्राला एकसंध करूया. या सत्याच्या लढ्यात आता रणशिंग फुंकायला हवे, तेव्हा या महाराष्ट्रावरून तू तुझा जीव ओवाळून टाक.
|
धर ध्वजा करी ऐक्याची ………….टाक ओवाळून काया।
महाराष्ट्राच्या ऐक्याचा ध्वज हातात धरून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी पोलादासारख्या कणखर पावलांनी पुढे जाण्याची गरज आहे.
या महाराष्ट्रासाठी लढण्याकरता स्वातंत्र्याची शपथ घे या मातृभूमीचे पांग फेडूनच तुला जावे लागेल. यासाठी या महाराष्ट्रावरून तू आपला जीव ओवाळून टाक.
|
कवितेतील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ |
आण घेणे
|
शपथ घेणे. |
उपकार फेडणे.
|
पांग फेडणे. |
काया ओवाळून टाकणे.
|
सर्वस्व अर्पण करणे. |
कंकण बांधणे. |
निश्चय करणे..
|
घाव झेलणे.
|
वार सहन करणे. |
शिंग फुंकणे..
|
युद्धास सुरुवात करणे.
|
स्वप्न साकार करणे. | स्वप्न पूर्ण करणे. |
कवितेचा भावार्थ समजून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा. |
कवितेतेवरील स्वाध्याय पहा. |
स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा. |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Hi is good 👍
Nice
Hi is good
Nice