Apache Patra Swadhyay Iyatta Dahavi | आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी
Apache Patra Swadhyay
(अ) पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर➤
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उदयोगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.
आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, ‘लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.’ वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.
(आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
उत्तर➤
मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते, मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.
(इ ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर➤
सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वत:साठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच.
मराठी कुमारभारती इयत्ता दहावी सराव कृतिपत्रिका व मागील वर्षातील
झालेल्या मार्च/सप्टेंबर/नोव्हेंबर बोर्ड परीक्षेतील मराठी विषयाच्या कृतिपत्रिका
या ठिकाणी दिलेल्या आहे.
सराव कृतिपत्रिका व बोर्ड कृतिपत्रिका मिळविण्यासाठी क्लिक करा
👉 सराव कृतिपत्रिका ( इयत्ता दहावी )
👉 मागील वर्षातील बोर्ड कृतिपत्रिका ( इयत्ता दहावी )
प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा
👉 इयत्ता- पाचवी (इयत्ता ५ वी )
👉 इयत्ता- आठवी (इयत्ता ८ वी)
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०१७ व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील सरावासाठी जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तरसुची डाउनलोड करण्यासाठी खाली निळ्या रंगाच्या सूचनेवर क्लिक करा. 👉👉 |
👉👉प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ या वर्षातील जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी क्लिक करा.
मराठी कुमारभारती इयत्ता : दहावी |
आश्वासक चित्र -नीरजा
बोलतो मराठी... – डॉ.नीलिमा गुंडी
आजी : कुटुंबाचं आगळ -प्रा.महेंद्र कदम
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता ) - द.भा.धामणस्कर
गवताचे पाते - वि.स.खांडेकर
वाट पाहताना - अरुणा ढेरे