Home लेखन कौशल्य जाहिरात लेखन मराठी jahirat lekhan in marathi

जाहिरात लेखन मराठी jahirat lekhan in marathi

57
2

जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी 
marathi jahirat lekhan

 आजच्या स्पर्धात्मक युगात जाहिरातीला अत्यंत मह्त्व आहे. जाहिरात म्हणजे  एखादया उत्पादनाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे होय. जाहिरात ही एक सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे एक कौशल्य आहे.
लोकांच्या मनात एखादया उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांंचे लक्ष वेधून घेणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो. जाहिरातीने योग्यरीत्या जनमानसावर पकड घेतली, की त्या उत्पादनाची विक्री वाढते, हेच उत्तम जाहिरातीचे गमक आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी (मोबाइल) यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक व्यापक झाली आहे.

jahirat lekhan in marathi

जाहिरात म्हणजे काय ?

सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वस्तू आपण निर्माण करीत नाही. म्हणून, आपल्या गरजेच्या वस्तूंसंबंधात आपल्याला काही माहिती हवी असते :
(१) आपल्याला हवी असलेली वस्तु कोण निर्माण करते ?
(२) ती वस्तू आपल्या गरजा किती प्रमाणात भागवते ?
(३) ती वस्तु कुठे मिळते?
(४) त्या वस्तूची किंमत काय ?
वरील माहिती पुरवणारा मजकूर म्हणजे ‘जाहिरात’ होय. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती आपल्याला जाहिरातींमार्फत मिळते. म्हणजेच, जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपर्यंत नेते.

 वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडून देण्याचे कार्य जाहिरात करते. आपण निर्माण केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणून जाहिरात आकर्षक करावी लागते.तसेच, एकाच प्रकारची वस्तू निर्माण करणारे अनेक निर्माते असतात. अशा वेळी आपलीच वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणूनही जाहिरात आकर्षक करावी लागते.

जाहिरात लेखन कसे करावे ?

(१) जाहिरात तयार करताना मथळा, उपमथळा तयार करावा. त्यासाठी सुभाषिते सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या वा गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी. लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करावा.
(२) जाहिरातीचा सुरुवातीला लक्ष वेधून घेणारे शब्द वापरावेत जसे खुशखबर, धमाकेदार सेल, एकावर एक फ्री, आधी या आधी मिळवा, 70% सूट इत्यादी
(३) जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षकरीतीने मांडावे.
(४) आलंकारिक, काव्यमय प्रभावी शब्दरचनेचा वापर करावा. जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
(५) ग्राहकांची सातत्याने बदलणारी आवड, सवयी, फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसायला हवे. तसेच,
(६) जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी.
(७) जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते, हे खरे. मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे अनिवार्य नाही.
(८) जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळींत केलेली मांडणीही पुरेशी.

(९) जाहिरातीत संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक (मोबाइल नंबर, इ-मेल आयडी) यांचा स्पष्ट उल्लेख करावा.

jahirat lekhan in marathi


जाहिरात लेखनासाठी विचारल्या जाणाऱ्या मूल्यमापन कृती :

  • शब्दांवरून जाहिरात लेखन.
  • जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.
  • विषय देऊन जाहिरात लेखन.
  • दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे.

jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi

नमुना कृती : ०१

विषय :
तुमची ताई भाजीपोळी  छान बनवते. अनेकांनी तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिला आहे.तिनेसुद्धा आता भाजीपोळी केंद्र चालवण्याचा निर्धार केला आहे.तिच्या या भाजीपोळी केंद्राची जाहिरात करा.

 उत्तर :

jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi

jahirat lekhan in marathi

उत्तर :
jahirat lekhan in marathi


letter writing in marathi पत्रलेखन उपयोजित लेखन मराठी |इयत्ता दहावी
batmi lekhan in marathi बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी 
Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन - सारांश लेखन मराठी
जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी marathi jahirat lekhan

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
whatsapp group-1

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here