विभाग -1 प्रथम भाषा (मराठी)
प्र. 1 ते 3 साठी सूचना : खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
डॉल्फिन हा खोल पाण्यात राहणारा मासा आहे. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. डॉल्फिन हा सस्तन आहे. म्हणजे तो अंडी घालत नाही तर आपल्या पिलांना जन्म देतो. तो वेगवेगळे बत्तीस आवाज काढू शकतो. तो माणसाप्रमाणे हसू शकतो तसेच रडूही शकतो. मानवानंतर डॉल्फिन हाच जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याचा मेंदू मानवापेक्षाही मोठा आहे. मानवाव्यतिरिक्त डॉल्फिन हा एकमेव प्राणी आहे की, ज्याला न्यूमोनिया व हृदयविकार होतो. कित्येक डॉल्फिन हार्ट ॲटॅकने मरतात. डॉल्फिनची दोस्ती फार प्रगाढ असते. त्याला माणसाबद्दल सहानुभूती वाटते. समुद्रात हरवलेल्या व्यक्तींसाठी डॉल्फिन वाटाड्यासारखा काम करतो.
1) सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता ?
1) व्हेल मासा
2) मानव.
3) डॉल्फिन
4) शार्क .
2) डॉल्फिन खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो?
1) सस्तन
2) उभयचर
3) पक्षी
4) भूचर
3) उताऱ्यात आलेल्या ‘वाटाड्या’ या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता ?
1) निगा राखणारा
2) धैर्य देणारा
3) मार्ग दाखवणारा
4) सहकार्य करणारा
प्र.4 ते 6 साठी सूचना : खालील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारीत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
“कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत”
कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील दोनशे चार गावामधून ११,४३२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या पथकाने कोल्हापूरातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शाळेतील शैक्षणिक साहित्य पूरामध्ये वाहून गेल्याने शैक्षणिक परिस्थिती गंभीर बनली असून, काही ठिकाणी शालेय इमारतीसुध्दा कोसळल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळा व कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली असून जागतिक बँकेने या परिस्थितीवर मात करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
4) कोणत्या जिल्ह्यात महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे?
1) अहमदनगर
2) सातारा
3) सोलापूर
4) कोल्हापूर
5) शाळा आणि कॉलेज यांना सुट्टी कोणी जाहीर केली?
1) मुख्याध्यापक
2) जिल्हाधिकारी
3) जागतिक बँक
4) आर्मी
6) ‘घोषित करणे’ या अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता आहे?
1) जाहीर करणे.
2) मात करणे.
3) मदत करणे.
4) उपलब्ध करणे.
7) वेगळे लिंग असलेला शब्द ओळखा.
1) मूल
2) शिंगरु
3) रेडकू
4) बैल
8) ‘कळस’ नामाचे वचन बदला.
1) कळशा
2) कळसी
3) कळस.
4) कळशी
9) वाक्यातील काळ ओळखा. रमेश बाबांबरोबर साताऱ्याची वाट चालू लागला.
1) भूतकाळ
2) वर्तमानकाळ
3) भविष्यकाळ
4) साधाकाळ
10) ‘सहलीला सर्व मुले गेली’. या वाक्यातील उद्देश भाग कोणता?
1) मुले
2) सहलीला
3) सहलीला गेली
4) सर्व मुले
11) वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
पहाटेची साखरझोप किती छान
1) उद्गारवाचक चिन्ह
2) पूर्णविराम
3) स्वल्पविराम
4) अर्धविराम
प्र. 12 ते 14 साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
12) गाण्याची ………………… चांगलीच रंगली होती.
1) पहाट
2) सभा
3) मैफिल
4) सराव
13) अचानक गवयाचा घसा………………..
1) कुरकुरु लागला.
2) खवखवू लागला.
3) फुरफूरु लागला.
4) खवळला.
14) त्यामुळे रंगाचा …………….. झाला.
1) सुरंग
2) तरंग
3) झुरंग
4) बेरंग
15) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
राजूच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच त्याला ……….. ……….
1) शिक्षा झाली.
2) बक्षिस मिळाले.
3) स्वागत झाले.
4) अपयश आले.
16) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो. त्याचा पर्याय शोधा.
राष्ट्रपती / पंतप्रधान / अब्दूल कलाम / भारताचे / होते
1) राष्ट्रपती
2) भारताचे
3) अब्दूल कलाम
4) पंतप्रधान
17) इंटरनेट या शब्दासाठी मराठीत कोणता शब्द वापरला जातो?
1) गुगल
2) याहू
3) आंतरजाल
4) भ्रमणध्वनी
18) दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द पर्यायात दिले आहेत. त्यातील वेगळा पर्याय ओळखा.
मित्र
1) सविता
2) मार्तंड
3) भास्कर
4) चंद्र
19) खालील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?
सत्कृत्य
1) सुत्कृत्य
2) कृत्य
3) दुष्कृत्य
4) उत्कृष्ट
20) खालीलपैकी कोणते एक अक्षर वापरल्यास शब्दकोडे पूर्ण होईल.
1) नि
2) अ
3) सु
4) टु
21) अचूक जोडशब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
चारा…………………..
1) गवत
2) पाणी
3) पेंढी
4) भरडा
22) खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्यांची अर्थ असलेली अयोग्य जोडी शोधा.
1) अतिशय तापट माणूस – अकरावा रुद्र
2) झोपाळू माणूस – कूपमंडूक
3) हडकुळा माणूस – काडी पहिलवान
4) अत्यंत भोळा माणूस – सांबाचा अवतार
23) रिकाम्या जागी योग्य समुहदर्शक शब्द निवडा.
मडक्यांमध्ये कडधान्य भरुन त्यांची. …………………. लावली होती.
1) रास
2) थप्पी
3) चवड
4) उतरंड
24) कुत्र्याचे पिल्लू तसे हरणाचे…….
1) कोकरु
2) पाडस
3) शिंगरु
4) बच्चा
25) पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील दुसरे अक्षर ओळखा.
ल च वा ना य
1) ल
2) ना
3) य
4) च
[ays_quiz id=”7″]